वयाची पन्नाशी उलटून गेली तरी अतिशय निरागस, मनमोहक, लाघवी दिसणाऱ्या अभिनेत्रींमध्ये एका अभिनेत्रीच नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे ऐश्वर्या नारकर.
ऐश्वर्या नारकर नेहमीच तिच्या फोटोशूटने चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरते. वेगवेगळ्या फोटोशूटमुळे ऐश्वर्या नेहमीच चर्चेत असते. साध्या लूकमध्येही तिच्या सौंदर्याची निखळता नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालत असते.(Aishwarya Narkar)
अशातच ऐश्वर्याच्या नव्या फोटोशूटने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. be yourself there is no one better असं कॅप्शन देत ऐश्वर्याच चंदेरी सिल्क साडीतील फोटोशूट प्रेक्षकांच्या नजरा वळवतंय.
या फोटोंमध्ये ऐश्वर्याने सफेद रंगाची चंदेरी सिल्क साडी घातली आहे. या फोटोने चाहत्यांना पुन्हा एकदा ऐश्वर्याने घायाळ केलं आहे. या फोटोंवरील एका कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
अभिनेता यशोमन आपटेने Aga aeee baaassss!!! Premat padloch ahe me!!! Ata veda hoin!!! अशी कमेंट केली आहे. तर चाहत्यांच्याही अनेक कमेंट्स या फोटोंवर आल्या आहेत.
अभिनेता यशोमन आपटे आणि ऐश्वर्या नारकर यांनी श्रीमंताघरची सून या मालिकेत एकत्र काम केलं होत.
या मालिकेत ऐश्वर्या आणि यशोमन यांची आई मुलाची जोडी पाहायला मिळाली. ऑनस्क्रिनप्रमाणे त्यांच्यात ऑफस्क्रिनही बॉण्ड असल्याचं पाहायला मिळत. (Aishwarya Narkar)
हे देखील वाचा – शिवकन्या देतेय गडकिल्ले संवर्धनाची हाक
सध्या ऐश्वर्या आपल्याला सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत पाहायला मिळतेय.