‘आई कुठे काय करते’ मालिकेतून अभिनेत्री अश्विनी महांगडेला चांगलीच लोकप्रियता मिळाली. मालिकेबरोबरच अश्विनी चित्रपटातूनही अधूनमधून भेटीस येत असते. दरम्यान अश्विनी तिच्या पारंपारिक वेशातील फोटोशूटमुळे विशेष चर्चेत असते. अश्विनीला गावाकडची ओढ आहेच हे तिच्या फोटोज वरून कळते. अश्विनीने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत राणू आक्काची भूमिका साकारली होती. अश्विनी मालिकेसोबत गडकिल्लाच्या संवर्धनासाठीही काम करताना दिसते. त्याचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते.(Ashvini Mahangade)
पहा अश्विनीने काय दिलाय सल्ला (Ashvini Mahangade)
नुकताच तिचा सोशल मीडियावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अश्विनी सांगतेय की, प्रत्येक जण हा रयतेच्या स्वराज्य प्रतिष्ठानाचा एक किल्ला आहे. म्हटल्यावर तुम्ही विचार करा की किती मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही एक एक जण आमच्यासाठी महत्वाचे आहात. असं अश्विनी उपस्थितांना सांगतेय. दरम्यान ती कोणत्या तरी गडावर जाऊन तिथे लोकांना माहिती देतेय. तिचा हा गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठीचा व्हिडीओ साऱ्यांच्या पसंतीस उतरलाय. चाहत्यांनी तिच्या या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अश्विनी गावाकडचे खासकरून त्यांच्या शेतात काम करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहतेही अश्विनीच्या या फोटोंवर लाईक्स कमेंटचा वर्षाव करत असतात. अश्विनी ही शेतकरी कुटुंबातुन आली आहे. अश्विनीला मायबाप शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव आहे. ती शेतात काम करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अश्विनीचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. (Ashvini Mahangade)
आई कुठे काय करते या मालिकेत अश्विनी अनघा या भूमिकेत दिसतेय. ती सोशल मीडियावरही अधूनमधून काही ना काही शेअर करत असते. अभिनयात तर अश्विनीचा हात कुणीही धरू शकत नाही, मात्र अश्विनीचा हात सामाजिक कार्यांमध्ये कुणीही धरू शकत नाही. सामाजिक भान जपणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे अश्विनी महांगडे. अश्विनी रयतेचं स्वराज्य स्थापन या सामाजिक संस्थेमार्फ़त बरेच सामाजिक उपक्रम राबवत असते. अभिनय सृष्टीतील आपला वेळ देऊन ती सामाजिक उपक्रमांमध्येही स्वतःचा अमूल्य वेळ देत असते.
हे देखील वाचा – पिवळ्या ड्रेसमध्ये शिवालीचा “बोल्ड”अंदाज
अश्विनी सध्या आई कुठे काय करते मालिकेत अनघाची भूमिका साकारत असून ती अरुंधतीच्या मागे भक्कमपणे उभी असणारी सून आहेच आणि यासाठी तीच सगळीकडून कौतुक होतं असत.