मराठी सिनेसृष्टीतील प्रिया बापट आणि उमेश कामत ही जोडी आदर्श जोडी म्हणून ओळखली जाते. प्रिया आणि उमेश एकमेकांसोबत परफेक्ट बॉण्ड शेअर करतात. कोणतीच जोडी कधी पफेक्ट नसते, तिला परफेक्ट बनवण्यासाठी एकमेकांना नेहमी सांभाळून घ्यावं लागत, आणि तेवढीच साथ सुद्धा द्यावी लागते. नुकतीच प्रिया तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, यात उमेश प्रियासाठी जेवण बनवताना दिसतोय. (Umesh Kamat Making Food)
या व्हिडियोमध्ये उमेश प्रियाची तब्बेत बरी नसल्यामुळे तिच्यासाठी घावन बनवताना दिसतोय. तो या व्हिडियोत म्हणतोय मी एक दम मस्त डोसा तुला बनवून देतो, त्यावर प्रिया म्हणते त्याला घावन म्हणतात. बायको आजारी असल्यामुळे बायकोची सेवा करावी लागते आहे असं देखील प्रिया यात म्हणताना दिसतीये.
हे देखील वाचा: मालिकेचं टायटल गायल्या नंतर जुईचं आणखी एक गाणं व्हायरल मोनिकाने ही दिली साथ
प्रिया बारावीमध्ये असतानाच उमेशच्या प्रेमात पडली होती. उमेश प्रियाला तिच्या प्रत्येक निर्णयात तिची साथ देताना दिसतो. प्रिया उमेशच्या लग्नाला ११ वर्षे पूर्ण झाले असून मराठी सिनेविश्वात या जोडीकडे आदर्श जोडी म्हणून पहिले जाते. याचबरोबर प्रिया आणि उमेशला एकमेकांसोबत वेळ घालवायला खूप आवडतो त्यामुळे ते कामातून वेळ मिळाला की एकत्र बाहेर फिरायला जात असतात. (Umesh Kamat Making Food)
प्रिया अभिनयासोबतच तिच्या फिटनेसमुळे सुद्धा चर्चेत असते. कोविडच्या वेळेस जिम बंद असताना प्रिया उमेश सोबत घरीच वर्कआउट करत असे. आणि याचे व्हिडियो आणि फोटोज सोशल मीडियावर देखील शेअर करत होती. याच बरोबर प्रिया तिच्या डाएटच्या बाबतीत सुद्धा खूप शिस्त बद्ध आहे. प्रिया बापट आणि उमेश कामत ही जोडी मराठी फिल्मइंडस्ट्रीमधील प्रसिद्ध जोडी असून या दोघांनी अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केलं आहे. प्रिया बारावीमध्ये असतानाच उमेशच्या प्रेमात पडली होती.
हा देखील वाचा: “मेकअप मॅनला अतिस्वातंत्र्य दिलं”ट्रोल करताच शिवालीचे चाहत्याला खडेबोल
प्रिया आणि उमेशचं बॉण्डिंग
उमेश प्रियाला तिच्या प्रत्येक निर्णयात तिची साथ देताना दिसतो. प्रिया उमेशच्या लग्नाला ११ वर्षे पूर्ण झाले असून मराठी सिनेविश्वात या जोडीकडे आदर्श जोडी म्हणून पहिले जाते. याचबरोबर प्रिया आणि उमेशला एकमेकांसोबत वेळ घालवायला खूप आवडतो त्यामुळे ते कामातून वेळ मिळाला की एकत्र बाहेर फिरायला जात असतात. मध्यतंरी काश्मीरला फिरायला गेले होते. (Umesh Kamat Making Food)
प्रियाने अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. टाईमपास २, वजनदार, आम्ही दोघी, काकस्पर्श, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय हे तिचे काही गाजलेले चित्रपट आहेत. तिचा पती उमेश सोबतचा “आणि काय हवं” ही मराठी वेबसिरीज सुद्धा खूप गाजली होती. या व्यतिरिक्त प्रिया “सिटी ऑफ ड्रीम” या हिंदी वेबसिरीजच्या दोन्ही भागात दिसली आहे. प्रियाने बापटने काही रियालिटी शोचे सूत्र संचालन सुद्धा केलं आहे.