शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मावळता सूर्य, रोमँटिक गप्पा अन्…; एकमेकांच्या प्रेमात हरवले नारकर कपल, खास व्हिडीओ केला शेअर

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 2, 2024 | 1:05 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
aishwarya narkar shared romantic video with husband avinash

मावळता सूर्य, रोमँटिक गप्पा अन्…; एकमेकांच्या प्रेमात हरवले नारकर कपल, खास व्हिडीओ केला शेअर

मराठी सिनेसृष्टीतील एक एव्हरीग्रीन जोडी म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेते अविनाश नारकर. गेली अनेक वर्ष ही जोडी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तसेच त्यांच्या कामाबरोबर ही जोडी सोशल मीडियावरदेखील तितकीच लोकप्रिय आहे. ही जोडी सोशल मीडियावरील अनेक ट्रेंडिंग रील व्हिडीओ शेअर करत असतात आणि त्यांच्या या व्हिडीओला चाहतेदेखील तुफान प्रतिसाद देत असतात. (Aishwarya Narkar On Instagram)

नारकर जोडीला त्यांच्या व्हिडीओवरुन अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. त्यांनी शेअर केलेल्या एखाद्या व्हिडीओला काही चाहते प्रतिसाद देतात, मात्र काही नेटकरी त्यांना ट्रॉलदेखील करतात. यावर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी कित्येकदा भाष्य करत ट्रोलर्सला सडेतोड उत्तरे दिली आहेत. अशातच या जोडीने नुकताच त्यांचा एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चांगलाच गाजत आहे.

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

आणखी वाचा – Video : लग्नानंतर कोकणात नवऱ्यासह गौतमी देशापांडेची धमाल-मस्ती, समुद्रामध्ये केलं Flyboarding, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

ऐश्वर्याने नुकताच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे सूर्यास्ताकडे बघत एकमेकांशी छान संवाद साधताना दिसत आहेत. यावेळी अविनाश हे काही खास गंमत करतानादेखील पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या यांनी सोनेरी रंगाची नक्षीकाम असलेली पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली असून त्यावर साजेसा काळ्या रंगाचा ब्लाऊजदेखील परिधान केला आहे. तर अविनाश यांनी मेहेंदी रंगाचा कुर्ता व पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केला आहे.

आणखी वाचा – “माझं पुढील आयुष्य…”, आईच्या निधनानंतर पहिल्यांदाच तेजश्री प्रधानची भावुक पोस्ट, म्हणाली, “तू सर्व काही…”

ऐश्वर्या यांनी “फक्त प्रेम” असं म्हणत हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघांचं एकमेकांवर असणारे निखळ प्रेम पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या व्हिडीओमधून त्यांचा खास रोमॅंटिक अंदाजही पाहायला मिळत आहे. “तुम्ही दोघे किती गोड आहात,  खूपच सुंदर जोडी, तुम्हा दोघांना कुणाची नजर लागू नये, असेच कायम आनंदी व हसत राहा” अशा अनेक कमेंट्स करत त्यांच्या या व्हिडीओचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर लाईक्स व कमेंट्सद्वारे या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.  

Tags: aishwarya narkarAvinash and Aishwarya Narkar New Reelavinash narkarentertainment newsmarathi entertainmentMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate

"तुला काय काय सहन करायचं आहे हे…", मुग्धाच्या भावंडानी पिळला प्रथमेशचा कान, मेहुणी म्हणाली, "आमच्या बहिणीला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.