अभिनेत्री गौतमी देशपांडेने नुकतीच २५ डिसेंबर रोजी ‘भाडिपा’ फेम स्वानंद तेंडुलकरसह विवाहबंधनात अडकली. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले. मेहंदी, संगीत या विधींपासून ते लग्नाच्या मुख्य विधींपर्यंतचे अनेक खास क्षण या जोडीने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले. अशातच लग्नानंतर ही जोडी कोकणात पोहोचली असून कोकणातील त्यांच्या खास ट्रीपचे काही फोटो व व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Gautami Deshpande And Swanand Tendulkar On Instagram)
गौतमी-स्वानंद यांच्या लग्नाच्या व रिसेप्शनच्या फोटो व व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला असल्याचा पाहायला मिळालं. त्यांच्या लग्न व रिसेप्शनच्या लूकचीही बरीच चर्चा झाली. दोघांच्या लग्नाआधीचे व लग्नानंतरचे लूक्स चाहत्यांना विशेष आवडले. अशातच आता दोघेही त्यांच्या लग्नाच्या धावपळीनंतर कोकणात गेले आहेत. कोकणात त्यांनी सुट्ट्यांचा मनमुराद आंनद लुटला असून यावेळी त्यांनी खूप धमाल मस्ती केल्याचेदेखील पाहायला मिळाले.
आणखी वाचा – “माझं पुढील आयुष्य…”, आईच्या निधनानंतर पहिल्यांदाच तेजश्री प्रधानची भावुक पोस्ट, म्हणाली, “तू सर्व काही…”
गौतमी-स्वानंद यांनी कोकणातील देवबाग इथे खास हजेरी लावत त्यांचे लग्नानंतरचे काही खास क्षण एन्जॉय करताना पाहायला मिळाले. यावेळी दोघांनी देवबागच्या समुद्रकिनाऱ्यावर पाण्यातील खास अॅक्टीव्हिटीदेखील केल्या. यावेळी त्यांनी समुद्राच्या पाण्यात फ्लाय बोर्डिंगचा खास आनंद लुटला. याचे काही खास फोटो व व्हिडीओ दोघांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. “माझ्या कम्फर्ट झोनमधून नवीन गोष्टी करून पाहणे हे माझे या वर्षाचे नवीन ध्येय आहे” असं म्हणत तिने हे खास फोटो व व्हिडीओ शेअर केले आहे.
आणखी वाचा – ‘आई कुठे…’ मालिकेच्या सेटवर रुपालीचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा, अभिनेत्री खास व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
गौतमी-स्वानंद यांनी शेअर केलेल्या या फोटो व व्हिडीओखाली अनेकांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर “धूम मचाले, छान, खुपच भारी, मस्त” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर गौतमीचे रंगभूमीवर ‘गालिब’ नावाचे नाटक सुरु आहे. यात तिच्याबरोबर अभिनेता विराजस कुलकर्णीदेखील आहे. तर स्वानंद हा ‘भाडिपा’सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये कार्यरत आहे.