स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. या मालिकेच्यानिमित्ताने तिने बराच काळानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. अभिनेत्री तिच्या अभिनयामुळे जितकी चर्चेत असते तितकीच ती सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. सोशल मीडिया वर ती तिच्या कामानिमित्त काही पोस्ट शेअर करत असते किंवा तिचे काही फोटोही शेअर करत असते. अशातच तिने नुकत्याच पोस्ट केलेल्या एका फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Tejashri Pradhan On Instagram)
काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीच्या आयुष्यात एक दु:खद घटना घडली. १६ नोव्हेंबर २०२३ रोजी तेजश्रीच्या आई सीमा प्रधान यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. आईच्या जाण्याने तेजश्री कोलमडून गेल्याचे पाहायला मिळाले. अशातच नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तेजश्रीने आईच्या आठवणीत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. तेजश्रीने आपल्या आईच्या आठवणीत इन्स्टाग्रामवर ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला असून एक भावुक पोस्टही शेअर केली आहे.
आणखी वाचा – ‘आई कुठे…’ मालिकेच्या सेटवर रुपालीचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा, अभिनेत्री खास व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
तेजश्रीने ही खास पोस्ट तिच्या आईच्या स्मरणार्थ केली असल्याचे म्हटले जात आहे. तसेच तेजश्रीने तिचा एक चेहऱ्यावर स्मितहास्य असलेला खास फोटो शेअर करत असे म्हटले आहे की, “मला माहित आहे की तू तिथून मला पाहत आहेस. तू कायम माझ्याबरोबर आहेस आणि माझ्यासाठी तु सर्व काही ठीक करशील या विश्वासाने मी माझं यापुढचं आयुष्य जगत राहणार आहे.”
आणखी वाचा – आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट अन्…; आमिर खानच्या घरी लगीनघाई, लेकीच्या लग्नासाठी अवाढव्य खर्च, व्हिडीओ समोर
दरम्यान, या पोस्टखाली मराठीतील अनेक कलाकरांनी व चाहत्यांनी सांत्वनपर कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री शिवानी बावकरने माझी खंबीर मुलगी असं म्हणत कमेंट केली आहे. “तुझ्या आईचे आशिर्वाद कायम तुझ्याबरोबर आहेत, आम्हा सर्वांना माहित आहे की तुझ्यासाठी हा खूप कठीण काळ आहे. पण तुझी आई तुझ्याबरोबर कायमच असणार आहे. हे हसू सदैव राहो आणि या दु:खातून सावरण्यासाठी तुला आणखी शक्ती मिळो” अशा कमेंट्स करत तेजश्रीच्या अनेक चाहत्यांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.