बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुला काय काय सहन करायचं आहे हे…”, मुग्धाच्या भावंडानी पिळला प्रथमेशचा कान, मेहुणी म्हणाली, “आमच्या बहिणीला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 2, 2024 | 1:23 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate

"तुला काय काय सहन करायचं आहे हे...", मुग्धाच्या भावंडानी पिळला प्रथमेशचा कान, मेहुणी म्हणाली, "आमच्या बहिणीला..."

काही दिवसांपूर्वीच गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे विवाहबंधनात अडकले. मुग्धा व प्रथमेशच्या लग्नाची धामधूम सोशल मीडियावरुन चांगलीच व्हायरल झालेली पाहायला मिळाली. पारंपरिक अंदाजात या जोडीने त्यांचा विवाहसोहळा उरकला. शिवाय त्यांच्या लग्नातील साधेपणानेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनीही हजेरी लावलेली पाहायला मिळाली. कोकणातील चिपळूण येथे त्यांचा शाही विवाह पार पडला. (Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate)

मुग्धा-प्रथमेशच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण दोघेही सोशल मीडियावरुन शेअर करत आहेत. अशातच मुग्धाच्या मोठ्या बहिणीने म्हणजेच मृदुल वैशंपायनने शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुगाच्या बहिणीने प्रथमेशचा कान पिळतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत “आम्ही सुटलो, आता तुझी वेळ आहे प्रथमेश. स्वतः ला सांभाळ. कान २ कारणांसाठी पिळला आहे. १. यासाठी की तुला काय काय सहन करायच आहे याचा अंदाज यावा. २. आमच्या बहिणीला आजिबात त्रास द्यायचा नाही, कळलं?” असं गमतीशीर कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

आणखी वाचा – शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरे लवकरच विवाहबंधनात अडकणार, फोटोवरील कॅप्शनने वेधलं लक्ष, म्हणाली, “तुझी गर्लफ्रेंड म्हणून…”

मुग्धाच्या लग्नाच्या काही दिवस आधीच तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं. मृदुलच्या लग्नातील साधेपणाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं व त्यांचं कौतुकही केलं. त्यानंतर मुग्धा व प्रथमेश यांच्या शाही विवाहसोहळा ही थाटामाटात संपन्न झाला. दोघांच्या लग्नाबरोबरच लग्नापुर्वीच्या विधींचेही फोटो चांगलेच व्हायरल झाले. घरच्या घरीच व साधेपणाने त्यांच्या लग्नापूर्वीचे विधी आटोपण्यात आले. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नातील लूकचही सार्यांनी कौतुक केलं.

आणखी वाचा – “माझं पुढील आयुष्य…”, आईच्या निधनानंतर पहिल्यांदाच तेजश्री प्रधानची भावुक पोस्ट, म्हणाली, “तू सर्व काही…”

‘आमचं ठरलं’ म्हणत मुग्धा व प्रथमेशने सोशल मीडियावरुन चाहत्यांसह त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर ही जोडी लग्नबंधनात केव्हा अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. त्यानंतर अखेर ही जोडी २१ डिसेंबर रोजी विवाहबद्ध झाली. प्रथमेश-मुग्धाच्या लग्नसोहळ्यातील रिसेप्शन लूकवर तसेच त्यांच्या साखरपुडा समारंभातील फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला.

Tags: entertainmentmugdha vaishampayanmugdha vaishampayan and prathamesh laghateMugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Weddingprathamesh laghate
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Bigg Boss 17

"माझे हातपाय थंड पडले अन्…", अंकिता लोखंडेने सांगितली सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह पाहिल्यानंतरची अवस्था, म्हणाली, "फक्त देह…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.