कोरोना हे संपूर्ण जगावर आलेले मोठे संकटच होत. कोरोना काळात संपूर्ण जग त्या वेळी घरी बसून होत. त्याचे परिणाम आजही दिसत आहेत. असे जरी असले तरी वाईटातून काही तरी चांगलं निघतच. या सगळ्यात सर्वानाच घर, कुटुंब आपण करत असलेलं काम याच महत्त्व नव्याने कळालं. हा काळ कठीण होता परंतु त्याच सोबत खूप काही शिकवून गेला. (Aishwarya Narkar lockdown Memory)
कोरोना काळात कलाकारांनी घरी राहून देखील वेगवगेळ्या प्रकारे आपल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला.अनेक मजेशीर व्हिडिओ कलाकार या काळात शेअर करायचे, कोणी स्वयंपाक शिकत होते, कोणी वेगवेगळी वादन वाजवायला शिकत होते. अनेक कलाकार व्हिडिओ कॉल द्वारे एकत्र नृत्याची जुगलबंदी करत होते या आणि अशा अनेक गोष्टी सुरु होत्या. या काळात वाईटासोबत अनेक चांगल्या आठवणी ही निर्माण झाल्या.कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर काम सुरु झाली. आणि आता कुठे ती घडी हळू हळू बसत आहे.
वाचा ऐश्वर्या यांची लॉकडाऊन मधील ही आठवण. (Aishwarya Narkar lockdown Memory)
असाच एक व्हिडिओ अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे. हा त्यांचा जुना व्हिडिओ आहे.या व्हिडिओच्या कॅप्शमधून त्यांनी सांगितलं आहे की, लॉकडाऊन नंतर नुकतंच शूट सुरु झालं होत. तेव्हा त्या एका ठिकाणी शूट करत होत्या तिथे त्यांना एक मुकजनावर दिसलं आणि त्यांनी त्याला खायला भरवलं. हा क्षण त्यांनी कॅमेरा मध्ये टिपला आणि आता गॅलरी चेक करताना त्यांना तो मिळाला आणि त्यांची ही आठवण त्यांच्या साठी खास होती. त्यांचा तो आनंद, दयाळूपणा त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. (Aishwarya Narkar lockdown Memory)
हे देखील वाचा : तितिक्षा आणि ऐश्वर्याची पडद्यामागची धमाल
ऐश्वर्या नारकर आज ही तितक्याच एनर्जीने प्रेक्षकांना समोर येत असतात. त्यांच्या अदानी प्रेक्षक आज हि घायाळ होतात. त्यांच्या फिटनेस कडे देखील त्या विशेष लक्ष देतात. त्यांचे वर्कआऊट व्हिडिओ देखील त्या शेअर करत असतात. सध्या ऐश्वर्या नारकर झी मराठी वरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत खलनायिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. कोणतीही भूमिका असो त्या भूमिकेला पूर्ण न्याय देतात. त्यांच्या हा उत्साह वाखण्याजोगा आहे.