महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून अभिनेत्री नम्रता संभेराव हिने अनेक पात्र साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. परंतु नम्रताचं लॉली हे पात्र सगळ्यात जास्त गाजलं. नम्रता सध्या कुर्रर्रर्र या नाटकानिमित्त संपूर्ण टीम सोबत परदेशात गेली असल्यामुळे नम्रताने तेथील अनेक आठवणी शेअर केल्या. नम्रताने पुन्हा एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर नम्रताचा सहकलाकार प्रसाद खांडेकर याने कमेंट केली आहे. प्रसादच्या या कमेंटने सगळ्याच चं लक्ष वेधलं आहे. (prasad khandekar and namrata sambherao)
नम्रताने हा व्हिडीओ न्यू यॉर्क शहरातील प्रसिद्ध ब्रिज ब्रुकलिनवर काढला आहे. या व्हिडिओला “एक दिन जिंदगी इतनी होगी हसीन झुमेगा आसमां गायेगी ये जमीं मैने सोचा ना था” या नव्वदीच्या काळातील प्रसिद्ध गाण्याचे बोल कॅप्शन म्हणून दिलं आहे. नम्रताचा हा व्हिडीओ खूप सुंदर आला आहे.
हे देखील वाचा: ऐश्वर्या यांनी दिला लॉकडाउनमधील आठवणींना उजाळा
. नम्रताच्या व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट देखील आल्या आहेत. या व्हीडिओवर एका नेटकऱ्याने “आनंदाच्या भरात तार तुटायच्या नायतर सगळेच झुमतील तार तुटल्यावर” अशी मजेशीर कमेंट केली आहे. तर प्रसाद खांडेकरने “अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरात जाऊन ऐतिहासिक ब्रुकलिन ब्रिज तोडायचा नम्रता संभेराव ह्यांच्याकडून जोरदार प्रयत्न ” अशी मिश्किल अंदाजात कमेंट केली आहे. प्रसाद आणि नम्रता एकमेकांसोबत स्पेशल बॉण्ड शेअर करतात. म्हणून ते एकमेकांची मस्करी तसेच धम्माल मस्ती करतच असतात. (prasad khandekar and namrata sambherao)
याचबरोबर प्रसाद आणि नम्रता यांचे ऑफस्क्रिन प्रमाणे ऑनस्क्रिन म्हणजेच हास्यजत्रेच्या सेटवर सुद्धा छान बॉण्डिंग पाहायला मिळत. प्रसाद आणि नम्रताचे अनेक स्किट गाजले आहेत.