तितिक्षा आणि ऐश्वर्याची पडद्यामागची धमाल

Titeekshaa And Aishwarya
Titeekshaa And Aishwarya

छोट्या पडद्यावरील कलाकार त्यांच्या मालिका किंवा रिऍलिटी शो व्यतिरिक्त त्यांच्या सोशलमीडिया वरून देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात.आणि प्रेक्षकांना देखील त्यांचे लाडके कलाकार पडद्यामागे काय धमाल करतात हे पाहायला कायमच आवडते.ऑफस्क्रीन किस्से, डान्स व्हिडिओ अशा अनेक गोष्टी यात असतात. सातत्याने असे व्हिडिओ केल्या मुळे काही जोड्या प्रेक्षकांच्या लाडक्या झाल्या आहेत.(Titeekshaa And Aishwarya)

यातीलच सोशलमीडिया वरील सध्या ट्रेंडिंग जोडी म्हणजे सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील नेत्रा आणि रुपाली म्हणजेच अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. मालिकेत रुपाली नेत्राला त्रास देताना आपल्याला पहायला मिळते. तर याच दोघी पडद्यामागे मात्र बऱ्याचदा एकत्र येऊन धमाल करत असतात. त्यांच्या या वेगवेगळ्या किस्यावरून त्यांचे ऑफस्क्रीन बॉण्डिंग छान असल्याचे दिसून येते.

पहा तितिक्षा आणि ऐश्वर्याची ऑफस्क्रीन धमाल (Titeekshaa And Aishwarya)

तितिक्षा आणि ऐश्वर्या त्यांच्या सोशलमीडिया वर बऱ्याच सक्रिय असतात. त्या एकमेकीन सोबत बरेच व्हडिओ, फोटोज काढत असतात. आणि वेळोवेळी हे फोटोज, रील त्या त्यांच्या सोशलमीडिया वरून शेअर देखील करत असतात. मालिकेत एकमेकींच्या विरोधात उभ्या असणाऱ्या नेत्रा आणि रुपालीच पडद्यामागचं हे रूप प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरत.नुकताच तितिक्षाने तिच्या इंस्टाग्राम अकांऊट वरून हँगिंग आऊट विथ ऐश्वर्या नारकर असे कॅप्शन देत त्या दोघींची एक रील पोस्ट केली आहे.यात त्यांनी एका ट्रेडिंग गाण्यावर सुंदर अदाकारी करत ट्रान्झिशन व्हिडिओ केला आहे. त्यांच्या या व्हिडिओ वर प्रेक्षकांनी लाईक आणि कमेंट्स करत ऐश्वर्याच्या उत्साहाचं कौतुक केलं आहे. तर प्रेक्षकांन सोबतच अभिनेत्री खुशबु तावडे, अश्विनी कासार, रेवती लेले तर अभिनेता सिद्धार्थ बोडके यांनी देखील कमेंटस करून त्यांच्या या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. (Titeekshaa And Aishwarya)

त्यांच्या या अदाकारीने त्या कायमच प्रेक्षकांना घायाळ करत असतात.ऐश्वर्या या वयातही तितक्याच जोमाने काम करतात.परंतु सध्या त्या त्यांच्या कामाबरोबरच हटके फोटोशूट मुळे प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत असतात.त्यांचा हा अंदाज देखील प्रेक्षकांना फार आवडतो. तर तितिक्षा देखील सध्याच्या लाडक्या अभिनेत्रीनंपैकी एक आहे. तिच्या नाजूक अंदाजाने, अभिनयाने ती कायम प्रेक्षकांचं मन जिंकते.

हे देखील पहा : ऐश्वर्या आणि तितिक्षाचा रिफ्रेशिंग व्हिडिओ तुम्ही पहिला का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Raj Kaveri in Danger
Read More

भाग्य दिले तू मला मालिकेत कावेरी साजरी करणार पहिली वटपौर्णिमा

वटपौर्णिमा हा सण प्रत्येक सुवासिनी साठी खूप महत्वाचा आणि जवळचा मानला जातो. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया हे व्रत…
Sundara Manamadhye Bharli Update
Read More

सुंदरा मनामध्ये भरली मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

प्रत्येक मालिकेचा असा खास चाहतावर्ग असतो. ती मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षक त्या मालिकेच्या कथानकावर, कलाकारांवर भरभरून प्रेम करत…
Yash Wedding
Read More

गौरीनंतर यशच्या आयुष्यात प्रेमाची नवीन चाहूल ?

आई कुठे काय करते ही मालिका सातत्याने टीआरपीच्या शर्यतीत अव्व्ल स्थानावर आहे.मालिकेमध्ये वेगवेगळ्या टप्यावर अनेक ट्विस्ट पाहायला मिळतात.सध्या…
Jahnavi Killekar
Read More

“आई एकविरेच्या दर्शनाला पोहचली जान्हवी” पाहा दर्शनाचा खास व्हिडिओ

प्रत्येकाची काहीं ना काहीतरी स्वप्न असतात जी पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालू असते. पाहिलेली स्वप्न पूर्ण होण्याचा आनंद…