“वाह दादा वाह” हे कानावर पडताच जिचा चेहरा डोळ्यासमोर येतो ती म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता तिच्या कामात जरी व्यस्त असली तरी ती तिच्या सोशल मीडियावर तितकीच सक्रिय असते. (Prajakta Mali Photoshoot)
प्राजक्ताने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटोशूटचे काही फोटोज शेअर केले होते. याचबरोबर या फोटोशूटचा एक व्हिडियो देखील तिने शेअर केला असून तिचा हा व्हिडीओ आता चर्चेत आला आहे.
हे देखील वाचा: काल match जिंकलो म्हणून yellow dress ? सायलीच्या फोटोवर ऋतुराजच्या फॅन्सचा धुमाकूळ
या फोटोंमध्ये प्राजक्ताने ऑरेंज पिंक कलरची साडी परिधान केली आहे, तसेच या लूकवर तिने डायमंडचे कानातले परिधान करत अगदी सध्या पद्धतीने हा लुक तयार केलाय. तसेच या लूकमध्ये प्राजक्ता ग्लॅमर्स दिसत आहे.
हे देखील वाचा: निळू फुले यांच्यावाढदिवशी लेकीची मोठी घोषणा
या व्हिडिओला प्राजक्ताने “बिरहा की इस चिता से तुम ही मुझे निकालो” हे गाणं टाकलं आहे. तिने याच गाण्याचे “मुझे ऐसे मत जलाओ मेरी प्रीत है कुंवारी तूम ले गये हो अपने संग नींद भी हमारी तुम्हें याद करते” ही वाक्य कॅप्शन मध्ये लिहिली आहेत. तिच्या या फोटोंप्रमाणे तिचे कॅप्शन सुद्धा तितकेच रमणीय आहेत. (Prajakta Mali Photoshoot)
प्राजक्ताने तिच्या करियरची सुरुवात स्टार प्रवाह पासून जरी केली असली तिला खरी प्रसिद्धी जुळून येती रेशीमगाठी मध्ये मेघना या भूमिकेत दिसली होती. तसेच प्राजक्ता आपल्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात होस्टिंग करताना दिसत आहे.