Abhishek Gaonkar Wedding : मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेता अभिषेक गांवकर नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. अभिषेक गांवकरने रील स्टार सोनाली गुरवसह लग्नगाठ बांधली. कोकणात निसर्गरम्य वातावरणात त्यांचा शाही लग्नसोहळा पार पडला. अभिषेक व सोनाली यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळाले. अगदी पारंपरिक अंदाजात ही जोडी विवाहबंधनात अडकलेली पाहायला मिळाली. अभिषेक व सोनाली यांच्या लग्नातील लूकची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. लग्नानंतर अभिषेक सोनालीला घेऊन त्याच्या गावच्या घरी गेला आहे.
अभिषेकच्या गावच्या घरी लग्नानंतरचे विधी पार पडताना पाहायला मिळत आहेत. लग्नानंतर खेळले जाणारे खेळ यावेळी पाहायला मिळत आहेत. कुटुंबियांच्या उपस्थिती दोघेही हे खेळ खेळताना दिसत आहेत. शिवाय सोनालीने दोघांचे एकत्र फोटो शेअर केले आहेत. यांमध्येही दोघे खूप खुश दिसत आहेत. गावच्या घराबाहेर पोज देत त्यांनी ही फोटो काढले आहेत. सोनाली आता गांवकरांच्या घरी रमलेली दिसत आहे. अभिषेकच्या कुटुंबियांबरोबर ती धमाल मस्ती करताना दिसली.
आणखी वाचा – “नाग को नचाने के लिये…”, लग्नात रेश्मा शिंदेचा नवऱ्यासाठी भन्नाट उखाणा, म्हणाली, “शादी हो गयी…”
लग्नानंतर घरी आल्यावर अभिषेकचे कुटुंबिय सोनाली-अभिषेकला उखाणा म्हणण्याचा आग्रह करताना दिसले. त्यामुळे दोघांनी उखाणे घेतलेले दिसले. त्यावेळी पहिल्यांदा सोनाली म्हणते की, “मंगळसूत्र असतं सौभाग्याची खूण, अभिषेकचं नाव घेते गावकरांची सून”. पुढे अभिषेक सोनालीसाठी उखाणा घेतो की, “आमचा संसार तेव्हाच होईल सुकर जेव्हा वामिका कापेल भाजी अन् मी लावेन कुकर”, अभिषेकचा उखाणा ऐकताच सोनाली आणि सर्वजण हसताना दिसतात.
Paaru Marathi Serial : किर्लोस्करांची सून होण्यास अनुष्काचा होकार असेल का?, पारूची घालमेल सुरु, मोठा ट्विस्ट
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेमुळे अभिनेता अभिषेक गावकर चर्चेत होता. मालिकेमध्ये अभिषेकने ‘श्रीनू’ही भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतूनही अभिषेकने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. तर, अभिषेक गावकरच्या बायकोबद्दल सांगायचे तर, सोनाली गुरव ही सोशल मीडिया एन्फ्लूएंसर आहेत. सोनालीही नेहमीच इन्स्टाग्रामवर विविध मजेशीर रिल्स व्हिडीओ बनवत असते. तिचा सोशल मीडियावर फार मोठा चाहतावर्ग असून तिच्या रिल्स तुफान व्हायरल होतात.