Sheryln Chopra : बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेली पाहायला मिळाली आहे. विशेषतः शर्लिन चोप्रा अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली असल्याचं पाहायला मिळालं आहे. आणि यामुळेच ती टीकेची शिकार होत आहे. अशातच आता अभिनेत्रीने तिच्या तब्येतीबाबत मोठा खुलासा केला आहे. जो ऐकून शर्लिनच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. या सगळ्या दरम्यान तिने तिच्या तब्येतीबद्दल सांगितले की, ती कधीच आई होऊ शकणार नाही. तिला सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटोसस (SLE) नावाचा आजार आहे. त्यामुळे २०२१ मध्ये तिची किडनीही निकामी झाली.
एका ताज्या मुलाखतीत अभिनेत्रीने आणखी काही गोष्टी सांगितल्या आहेत. ‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत शर्लिन चोप्रा म्हणाली, “माझ्या डॉक्टरांनी मला सांगितले आहे की या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मला आयुष्यभर औषधे घ्यावी लागतील. मी दिवसातून तीन वेळा घेतो. मी प्रेग्नेंसीबद्दल कधीही विचार करु नये, असा सल्लाही त्यांनी दिला. कारण ते मूल आणि आई दोघांसाठीही घातक ठरु शकते.
शर्लिन चोप्राने सांगितले की, तिला आई व्हायचे आहे आणि त्यासाठी ती इतर पर्याय शोधत आहे, ज्यामुळे तिला किमान तीन किंवा चार मुले होण्याची आशा आहे. “मी थोडा विचार केला आहे. मला प्रत्येक नावाची सुरुवात A ने करायची आहे. मला एने सुरू होणारी नावं खूप आवडतात. मी लवकरच सर्वांना सांगेन”. शर्लिनच्या या बोलण्यावरुन तिला आई होण्याची ओढ लागली असल्याचं समोर आलं आहे. मात्र तिला असणाऱ्या आजारामुळे ती कधीच आई होऊ शकत नाही याचंही तिला दुःख आहे.
शर्लिन पुढे म्हणाली, “मला वाटते की मी आई होण्यासाठी जन्माला आले आहे कारण जेव्हा मी मुलांबद्दल विचार करते तेव्हा मला वेगळाच आनंद होतो. मुले येण्याआधीच मला खूप आनंद होतो. त्यांच्या आगमनानंतर मला किती आनंद होईल याची कल्पना करा. तरी मी काम करत राहीन. मी त्यांना माझ्याबरोबर घेईन. सुरुवातीला मी एक आया ठेवीन जी त्यांची काळजी घेईल”.