Reshma Shinde Wedding : ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे नुकतीच लग्न बंधनात अडकली. रेश्मा शिंदे हिने पवन यांच्यासह लग्न गाठ बांधली असल्याचे समोर आले आहे. सध्या सोशल मीडियावर रेश्माच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ, फोटो तुफान व्हायरल होताना पाहायला मिळतात. बरेच दिवसांपासून रेश्माच्या लग्नाची चर्चा सुरु होती. थेट केळवणाचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने लग्न बंधनात अडकणार असल्याची जाहीर कबुली साऱ्यांसमोर दिली. तेव्हापासून रेश्माचा नवरा कोण असा प्रश्न साऱ्यांना सतावत होता. कारण रेश्माने तिच्या नवऱ्याचं नाव आणि तिच्या नवऱ्याचा चेहरा गुलदस्त्यात ठेवला होता. त्यानंतर अभिनेत्रीने थेट हळदी समारंभादिवशी तिच्या नवऱ्याचा फोटो शेअर करत ‘आमची हळद’ असं म्हणत हळदी समारंभातील खास फोटो शेअर केले.
यावेळी रेश्माचा नवरा पवनची झलकही पाहायला मिळाली. रेश्माचा नवरा कोणत्या क्षेत्रात कामाला आहे, तो नेमकं काय काम करतो हे अद्याप समोर आलेलं नाहीये. मात्र रेश्मा व पवन यांची सुंदर अशी जोडी आता लग्न बंधनात अडकली असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात रेश्मा व पवन यांनी लग्न गाठ बांधली. रेश्माच्या लग्नाला सृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळालं. रंग माझा वेगळा मालिकेच्या टीमने रेश्माच्या लग्नात धमाल-मस्ती केलेली पाहायला मिळाली. लग्नात धुमाकूळ घालतानाचे अनेक व्हिडीओ, फोटो त्यांचे समोर आलेले पाहायला मिळाले.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : किर्लोस्करांची सून होण्यास अनुष्काचा होकार असेल का?, पारूची घालमेल सुरु, मोठा ट्विस्ट
यावेळी रेश्माने ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमसाठी स्पेशल उखाणा घेतलेला पाहायला मिळतोय. रेश्मा घेतलेला हा उखाणा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावेळी रेश्मासह ‘रंग माझा वेगळा’ मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित असल्याचे पाहायला मिळतंय. यावेळी बोलताना रेश्माने उखाणा घेत असं म्हटलं की, “नाग को नचाने के लिये बजाते है बीप, अब शादी हो गयी है मेरी पवन से, और सब आगये है मेरी ‘रंग माझा वेगळा’ की टीम”.
रेश्माने घेतलेला हा उखाणा साऱ्यांच्याच पसंतीस पडला आणि त्यानंतर सगळ्यांनीच कल्ला करत तिचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. रेश्माने मराठमोळ्या पद्धतीने आणि दाक्षिणात्य अशा दोन्ही पद्धतीने लग्न केलं असल्याचं समोर आलं. मराठमोळ्या लूक मधील अभिनेत्रीचे फोटोही समोर येत चांगलेच व्हायरल झाले. तर, अभिनेत्रीच्या दाक्षिणात्य लूकलाही विशेष पसंती मिळालेली पाहायला मिळाली.