Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ या रिऍलिटी शोचा अंतिम सोहळा आज संध्याकाळी संपन्न होणार आहे. या सोहळ्याची अनेक चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच चाहत्यांच्या या उत्सुकतेला पूर्णविराम मिळणार असून ‘बिग बॉस १७’चा स्पर्धक प्रेक्षकांना भेटणार आहे. मुन्नवर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी, अंकिता लोखंडे हे कलाकार ‘बिग बॉस’च्या फिनालेसाठी सज्ज झाले आहेत. यापैकी नेमका कोणता स्पर्धक ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरणार हे पाहणं रंजक ठरणारं आहे.
अशातच ‘बिग बॉस’च्या घरातील एक स्पर्धक जोडी हा रिऍलिटी शो सुरु झाल्यापासून चर्चेत राहिली. ती जोडी म्हणजे अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन. अंकिता व विकी जैन यांचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास सर्वांनाच माहित आहे. हा शो सुरु झाल्यापासून दोघांमध्ये केवळ भांडणच सुरु झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे बरेचदा अंकिता व विकी ट्रोलही झाले. कालांतराने दोघांमधील भांडण वाढत गेली. आणि टेलिव्हिजनवर न पाहण्यासारखी ही भांडण अंकिता व विकी जैन यांच्या कुटुंबीयांनी खटकली.
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या या सीझनमध्ये स्पर्धकांच्या जवळच्या व्यक्तींनी सहभाग घेतला होता. तेव्हा अंकिता लोखंडेची सासू व आई दोघींनीही हजेरी लावली होती. त्या दरम्यान अंकिताच्या सासूबाईंनी अंकिताचा खरपूस समाचार घेतला. तसेच घरातून बाहेर आल्यानंतरही त्यांनी अनेक मुलाखतींदरम्यान अंकितावर आरोप-प्रत्यारोप केले. त्यामुळे अंकिता लोखंडेबाबत तिच्या सासूने केलेलं भाष्य चर्चेत राहील.
Ankita's mother and mother-in-law (Vicky's mother) on the set of #BiggBoss17GrandFinalepic.twitter.com/ewlIYX0fFb
— #BiggBoss_Tak???? (@BiggBoss_Tak) January 27, 2024
काही असलं तरी अंकिता आज फिनालेसाठी सज्ज झाली आहे. तिचा नवरा विकी जैन घरातून बाहेर पडल्यानंतर अंकिताला सपोर्ट करताना दिसला. आता फिनालेसाठी अंकिताला सपोर्ट करण्यासाठी तिची आई व सासू या दोघींही हजेरी लावल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये अंकिताची आई व अंकिताची सासूबाई अंकिताला सपोर्ट करण्यासाठी फिनाले साठी आलेल्या दिसत आहेत. त्यावेळी घराबाहेर जमलेल्या पापाराझींनी अंकिताबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, “अंकिता जिंकून ट्रॉफी घरी आणेल” असा विश्वास व्यक्त केला.