शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : ना अंकिता, ना मुन्नवर मराठमोळ्या शिव ठाकरेचा या स्पर्धकाला पाठिंबा, पोस्ट शेअर करत म्हणाला, “दिल…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 28, 2024 | 1:06 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : ना अंकिता, ना मुन्नवर मराठमोळ्या शिव ठाकरेचा या स्पर्धकाला पाठिंबा, पोस्ट शेअर करत म्हणाला, "दिल…"

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा आज धुमधडाक्यात पार पडणार आहे. ‘बिग बॉस’ची ही ट्रॉफी कोणता स्पर्धक पटकावणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मुन्नवर फारुकी, अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी हे पाच स्पर्धेत ‘बिग बॉस’च्या फिनालेसाठी सज्ज झाले आहेत. या पाच स्पर्धकांनी त्यांच्या खेळाने व चाहत्यांच्या प्रेमाने इथवरचा प्रवास पूर्ण केला आहे. सोशल मीडियावर ‘बिग बॉस १७’ च्या आजच्या या फिनालेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पोस्ट शेअर करत चाहत्यांनी व इतर कलाकार मंडळींनी स्पर्धकांच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्या आहेत.

अनेक कलाकारांनी यंदाच्या ‘बिग बॉस’च्या फिनालेमधील स्पर्धकांना पाठिंबा दर्शवलेला पाहायला मिळत आहे. या दरम्यान मराठमोळ्या शिव ठाकरेनेही ‘बिग बॉस’च्या घरातील एका स्पर्धकाला पाठिंबा दर्शवला असल्याचं समोर आलं आहे. शिव ठाकरे हा ‘बिग बॉस’ मराठीचा विजेता होता. ‘बिग बॉस’ मराठी मुळे शिव ठाकरेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याचा सिनेसृष्टीतील प्रवास हा उत्तम सुरु आहे. ‘बिग बॉस १७’ मधील एका स्पर्धकाला पाठिंबा दर्शवणारी पोस्ट शिवने सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. हा स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नसून अरुण माशेट्टी आहे.

आणखी वाचा – “अजून काय पाहिजे…”, राज ठाकरेंची कौतुकाची थाप मिळताच तुषार देवलची खास पोस्ट, म्हणाला, “त्यांनी खांद्यावर हात ठेवला अन्…”

सोशल मीडियावर सर्वत्र अंकिता लोखंडे, मुन्नवर फारुकी या स्पर्धकांना विजेतेपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र ‘बिग बॉस’ विजेता शिव ठाकरे याने अरुण माशेट्टीला पाठिंबा दर्शवला आहे. अरुणच्या कामाचं कौतुक केल्याने यावरुन शिवला अरुण माशेट्टी खरा विजेता असल्याचे वाटतंय हे सिद्ध होत आहे.

आणखी वाचा – “कोणत्याच अटी नाहीत पण…” पृथ्वीक प्रतापने भावी पत्नीबाबत केलं भाष्य, म्हणाला, “माझ्या मागण्या…”

शिवने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट शेअर करत, “लव्ह यु ब्रदर, दिलवाला बंदा” असं म्हणत अरुण माशेट्टीचा फोटो पोस्ट केला आहे. अद्याप ‘बिग बॉस १७’चा विजेता प्रेक्षकांसमोर आलेला नाही त्यामुळे ट्रॉफी नेमकी कोणता स्पर्धक पटकावणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Tags: ankita lokhandearun mashettybigg bossbigg boss 17entertainmentshiv thakare
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेवर आरोप केल्यानंतर सुनेला पाठिंबा देण्यासाठी सासू हजर, अभिनेत्रीच्या आईसह दिसली अन् म्हणाली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.