शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सासू-सासऱ्यांकडून कौतुक, वडिलांना अश्रू अनावर अन्…; स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णीच्या लग्नाचा Unseen Video, चाहतेही भारावले

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 26, 2024 | 10:00 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Actress swanandi tikekar and singer ashish Kulkarni shared special glimpse of their 1 month wedding anniversary

सासू-सासऱ्यांकडून कौतुक, वडिलांना अश्रू अनावर अन्...; स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णीच्या लग्नाचा Unseen Video, चाहतेही भारावले

गेल्या वर्षात संगीत विश्वातील मुग्धा-प्रथमेश ही जोडी विवाहबंधनात अडकली. यांच्यापाठोपाठ संगीत विश्वासंबंधित आणखी एक जोडी लग्नबंधनात अडकली ती म्हणजे गायक आशिष कुलकर्णी व अभिनेत्री-गायिका स्वानंदी टिकेकर. आशिष कुलकर्णी हा गायक असून त्याने ‘इंडियन आयडल’सारख्या गाण्यांच्या शोजमध्ये भाग घेतला होता. तर स्वानंदी हिचादेखील संगीत क्षेत्राशी थेट संबंध आहे. स्वानंदीची आई आरती अंकलीकर-टीकेकर या शास्त्रीय गायिका आहेत. स्वानंदी हीदेखील ‘सिंगिंग स्टार’ या गाण्याच्या शोची विजेती होती.

स्वानंदी-आशिष ही जोडी २५ डिसेंबर २०२३ रोजी विवाहबंधनात अडकली. यादरम्यान, त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. अशातच स्वानंदीने त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणखीएक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यात संगीत, मेहेंदी, हळद यासह लग्नातील प्रत्येक खास क्षण पाहायला मिळत आहे. त्यांच्या या लग्नाच्या खास क्षणांच्या व्हिडीओची सुरुवात आशिषच्या सुमधुर आवाजाने होते.

या व्हिडीओच्या सुरुवातीला आशिष ९०च्या दशकातील ‘जानू मेरी जान’ हे सुप्रसिद्ध गाणं गात असल्याचे पाहायला मिळत आहे. तर यापुढे ‘डंकी’ या चित्रपटातील ‘ओ माही’ गाण्याच्या रोमॅंटिक ओळींसह आशिष-स्वानंदी यांचे लग्नातील काही रोमॅंटिक व हळवे क्षणदेखील पाहायला मिळत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये आशिष व स्वानंदीचे आई-वडील आपल्या मुलांच्या लग्नाविषयी आनंदी असल्याच्या भावनादेखील व्यक्त करताना पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by LENSFIXED™ Photo Works (@lensfixed_photoworks)

आणखी वाचा – “हा माणूस एक भाबडा…”, मनोज जरांगे-पाटलांच्या आंदोलनात सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सहभागी, म्हणाली, “आता तरी न्याय…”

या व्हिडीओमध्ये आशिष स्वानंदीच्या गळ्यात मंगळसूत्र व वरमाला घालत असतानाचे तसेच ते दोघे सप्तपदी घेत असतानाचे काही हळवे क्षणही पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर लेकीच्या लग्नात उदय टीकेकर हेदेखील भावुक झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. यासह स्वानंदी व आशिष यांच्या मित्रांची धमाल मस्तीदेखील या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – …अन् सलमान खानने शब्द पाळला, नऊ वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलाची इच्छा केली पूर्ण, स्वतः त्याच्या घरी गेला आणि…

दरम्यान, स्वानंदी-आशिष यांच्या या लग्नात त्यांच्या विविध लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. अशातच स्वानंदी-आशिष यांच्या लग्नाच्या या खास व्हिडीओलादेखील नेटकऱ्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर त्यांच्या लग्नाला १ महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चाहत्यांनी त्यांना कमेंट्समध्ये शुच्छादेखील दिल्या आहेत.

Tags: ashish kulkarnientertainment newsmarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newssingerswanandi tikekarअभिनेत्रीआशिष कुलकर्णीगायकमनोरंजन बातमीमराठी बातमीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमीस्वानंदी टीकेकर
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Priya Bapat shared photo and expressed her anger about the cleanliness of the theatre see the details

“नाट्यगृह स्वच्छ ठेवणे...”, नाट्यगृहाच्या अस्वच्छतेबाबत प्रिया बापटचा संताप, म्हणाली, “ही साधी गोष्ट...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.