गेल्या वर्षात संगीत विश्वातील मुग्धा-प्रथमेश ही जोडी विवाहबंधनात अडकली. यांच्यापाठोपाठ संगीत विश्वासंबंधित आणखी एक जोडी लग्नबंधनात अडकली ती म्हणजे गायक आशिष कुलकर्णी व अभिनेत्री-गायिका स्वानंदी टिकेकर. आशिष कुलकर्णी हा गायक असून त्याने ‘इंडियन आयडल’सारख्या गाण्यांच्या शोजमध्ये भाग घेतला होता. तर स्वानंदी हिचादेखील संगीत क्षेत्राशी थेट संबंध आहे. स्वानंदीची आई आरती अंकलीकर-टीकेकर या शास्त्रीय गायिका आहेत. स्वानंदी हीदेखील ‘सिंगिंग स्टार’ या गाण्याच्या शोची विजेती होती.
स्वानंदी-आशिष ही जोडी २५ डिसेंबर २०२३ रोजी विवाहबंधनात अडकली. यादरम्यान, त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. अशातच स्वानंदीने त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणखीएक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यात संगीत, मेहेंदी, हळद यासह लग्नातील प्रत्येक खास क्षण पाहायला मिळत आहे. त्यांच्या या लग्नाच्या खास क्षणांच्या व्हिडीओची सुरुवात आशिषच्या सुमधुर आवाजाने होते.
या व्हिडीओच्या सुरुवातीला आशिष ९०च्या दशकातील ‘जानू मेरी जान’ हे सुप्रसिद्ध गाणं गात असल्याचे पाहायला मिळत आहे. तर यापुढे ‘डंकी’ या चित्रपटातील ‘ओ माही’ गाण्याच्या रोमॅंटिक ओळींसह आशिष-स्वानंदी यांचे लग्नातील काही रोमॅंटिक व हळवे क्षणदेखील पाहायला मिळत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये आशिष व स्वानंदीचे आई-वडील आपल्या मुलांच्या लग्नाविषयी आनंदी असल्याच्या भावनादेखील व्यक्त करताना पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये आशिष स्वानंदीच्या गळ्यात मंगळसूत्र व वरमाला घालत असतानाचे तसेच ते दोघे सप्तपदी घेत असतानाचे काही हळवे क्षणही पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर लेकीच्या लग्नात उदय टीकेकर हेदेखील भावुक झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. यासह स्वानंदी व आशिष यांच्या मित्रांची धमाल मस्तीदेखील या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – …अन् सलमान खानने शब्द पाळला, नऊ वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलाची इच्छा केली पूर्ण, स्वतः त्याच्या घरी गेला आणि…
दरम्यान, स्वानंदी-आशिष यांच्या या लग्नात त्यांच्या विविध लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. अशातच स्वानंदी-आशिष यांच्या लग्नाच्या या खास व्हिडीओलादेखील नेटकऱ्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर त्यांच्या लग्नाला १ महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चाहत्यांनी त्यांना कमेंट्समध्ये शुच्छादेखील दिल्या आहेत.