बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने आजवर त्याच्या अभिनयाबरोबरच लाखो लोकांच्या मदतीसाठी पुढे येत प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. बरीच अशी कलाकार मंडळी आहेत जी नकळतपणे गरजूंना मदत करत असतात. मात्र याबद्दल ते कुठेही काहीच बोलत नाही. दरम्यान सलमान खान आपल्या आश्वासनांमध्ये किती खरा आहे याचा पुरावा नुकताच पाहायला मिळाला. सलमान खान अलीकडेच त्याच्या नऊ वर्षीय चाहता जगनबीरला भेटला, ज्याने केमोथेरपीच्या नऊ फेऱ्यांनंतर कर्करोगाचा पराभव केला. (Salman Khan Fam Moment)
२०१८ मध्ये, सलमान खान पहिल्यांदा जगनबीरला मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये भेटला, जिथे चार वर्षांच्या मुलावर त्याच्या ट्यूमरसाठी केमोथेरपी सुरु होती. कॅन्सरशी लढाई संपल्यानंतर सलमान खानने जगनबीरला बळ मिळावे म्हणून त्याला भेटण्याचे आश्वासन दिले होते आणि सलमान खान त्याला भेटायला आला होता. गेल्या वर्षी जगनबीरने कॅन्सरवर मात केल्यामुळे, सलमानने डिसेंबर २०२३ मध्ये त्याच्या वांद्रे येथील घरी त्याची भेट घेतली आणि जगनबीरच्या उपचारांच्या वाईट काळात त्याने दिलेले वचन पूर्ण केले.
‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत जगनबीरची आई सुखबीर कौर यांनी खुलासा केला की, “वयाच्या तिसऱ्या वर्षी जगनबीरच्या मेंदूमध्ये नाण्यांच्या आकाराचा ट्यूमर असल्याचे निदान झाले होते, त्यानंतर त्यांची दृष्टी कमी होऊ लागली होती. या कठीण परिस्थितीला तोंड देत दिल्ली किंवा मुंबईत उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. जगनच्या प्रकृतीची काळजी घेऊन त्याचे वडील पुष्पिंदर यांनी त्याला मुंबईला नेण्याचा निर्णय घेतला. मासूम जगनला खात्री होती की तो सलमान खानला नक्कीच भेटेल”.
सुखबीर कौरने असाही खुलासा केला की, “जगनला असे पाहून तिने सत्य न सांगण्याचा निर्णय घेतला. एकदा जगनबीर रुग्णालयात दाखल असताना सलमानला भेटण्याची इच्छा व्यक्त करणारा व्हिडीओ बनवण्यात आला होता. जगनबीरला भेटून दिलेले वचन पूर्ण करणाऱ्या सलमानपर्यंत हा व्हिडीओ पोहोचला. भावनांनी भरलेल्या जगनने सलमानच्या चेहऱ्याला आणि त्याच्या ब्रेसलेटला स्पर्श केला. सुखबीरने आनंदाने सांगितले की त्यांचा मुलगा आता बरा आहे, त्याची ९९ टक्के दृष्टी परत आली आहे आणि तो दररोज शाळेत जातो”.