शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

स्पृहा जोशीचे आई-बाबा दोघंही रुग्णालयात दाखल, उपचारादरम्यानचा फोटो समोर, म्हणाली, “दोघांचीही तब्येत सुधारत आहे आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 15, 2024 | 3:57 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actress Spruha Joshi shared a post on social media and said that her parents are not well see the details

स्पृहा जोशीने एक पोस्ट शेयर करत तिच्या आई-वडिलांची तब्येत ठीक नसल्याचे म्हटलं आहे.

मराठी सिनेसृष्टीची सर्वगुसंपन्न अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीला ओळखले जाते. ती एक उत्तम अभिनेत्री आहेच. पण त्याचबरोबर ती एक उत्तम कवयित्री, गायिका, लेखिका आणि सूत्रसंचालिकादेखील आहे. टीव्हीचा छोटी स्क्रीन असो वा चित्रपटाची मोठी स्क्रीन… स्पृहाने आपल्या अभिनयाने कायमच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशातच नुकताच स्पृहाचा वाढदिवस झाला. मराठी कलाविश्वातून तिला भरभरुन शुभेच्छा मिळाल्या. अशातच आता नुकतंच तिने फोटो पोस्ट करत सर्वांचे आभार मानले. त्याचबरोबर तिने आई-वडील रुग्णालयात असल्याची माहितीही दिली आहे. त्यांना नक्की काय झालं आहे? हे तिने सांगितलं नसलं तरी त्यांची तब्येत आता सुधारत असल्याचे तिने या पोस्टमधून म्हटलं आहे. (Spruha Joshi Parents)

स्पृहाने इन्स्टाग्रामवर तिचा स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे, या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “१३ ऑक्टोबरला झालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अजून येत आहेत. आई-बाबांची तब्येत सुधारत आहे. ज्यूपिटर हॉस्पिटलमधील सर्वजण त्यांची आणि पेशंटच्या नातेवाईकांची प्रेमाने काळजी घेत आहेत. सगळे स्नेही, आप्तेष्ट, मित्र ‘काहीही लागलं तरी सांग’ म्हणून दिलासा देत आहेत. इतकी माणसं जोडलेली असणं ही त्या दोघांची पुण्याई”.

View this post on Instagram

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

आणखी वाचा – “एवढ्या मोठ्या आजारातून ते बाहेर पडले पण…”, अतुल परचुरेंबाबत बोलताना श्रेयस भावुक, म्हणाला, “खूप दुर्दैवी आहे की…”

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “आपल्यावर प्रेम करणारी इतकी माणसं आहेत, ही भावना फार मन भरून टाकणारी आहे. मी तुम्हा सगळ्यांची ऋणी आहे. प्रत्येकाला उत्तर देणं जमलं नाही. रागावू नका. लोभ आहेच, तो वाढत राहो”. या पोस्टखाली स्पृहाच्या अनेक चाहत्यांनी तिच्या आई-वडिलांची तब्येत लवकर बरी व्हावी अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. “सर्व काही ठीक होईल”, “श्री स्वामी समर्थ त्यांच्या पाठीशी आहेत”, “दोघं ही छान ठणठणीत होतील” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी स्पृहाला खंबीर राहण्यास सांगितले आहे.

आणखी वाचा – साताजन्माची साथ अपूर्णच! अतुल परचुरेंच्या आजारपणात पत्नी सोनिया यांनी दिला होती खंबीर साथ, स्वत:च सांगितलेली संपूर्ण परिस्थिती

दरम्यान,  स्पृहाबद्दल सांगायचं झालं, तर ‘उंच माझा झोका’, ‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकांमुळे स्पृहा जोशी घराघरांत लोकप्रिय झाली. चित्रपट, नाटक, मालिका, वेब सीरिज अशा चारही माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनयाप्रमाणेच स्पृहा तिच्या कवितांमुळे देखील चर्चेत असते.

Tags: marathi actressspruha joshiSpruha Joshi Parents
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Actor Atul Parchure Passes Away

Atul Parchure Death : ४० वर्षांची मैत्री संपली! अतुल परचुरेंना शेवटचं पाहताना सुकन्या व संजय मोनेंना रडू अनावर, स्टेजवरील 'तो' शेवटचा व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.