सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘सातव्या मुलीची…’ फेम तितिक्षा तावडेने आईबरोबर घरीच बनवला स्वयंपाक, पुरी-भाजी, पुलाव अन्…; व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 14, 2023 | 1:29 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
titeeksha and khushboo tawde making biryani and puri diwali special video shared on social media

‘सातव्या मुलीची...’ फेम तितिक्षा तावडेने आईबरोबर घरीच बनवला स्वयंपाक, पुरी-भाजी, पुलाव अन्...; व्हिडीओ व्हायरल

यंदा दिवाळीनिमित्त सर्वत्र आनंदाचं व उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वजण दिवाळी मोठ्या धूमधडाक्यात साजरी करताना दिसत आहेत. दिवाळीनिमित्त अनेक बॉलिवूड कलाकारांच्या घरी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. तर मराठमोळे कलाकारदेखील आपल्या मित्रपरिवार व प्रियजनांबरोबर दिवाळी साजरी करताना दिसत आहेत आणि हा आनंद ते आपल्या सोशल मिडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअरही करतात. अशातच मराठी अभिनेत्री तितिक्षा तावडेने तिच्या सोशल मीडियावरून एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. (Actress Titeeksha Tawde Shared Diwali Special Video)

तितिक्षाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती जेवण करताना दिसत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओत स्वत: तितिक्षा, तिची बहीण खुशबू तावडे त्याचबरोबर त्यांची आई व भाऊ दिसत आहे. या व्हिडीओत तितिक्षा, खुशबू आणि त्यांची आई जेवण बनवताना दिसत असून त्यांनी बिर्याणी, पुरी असा रुचकर जेवणाचा बेत केलेला दिसत आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओत तितिक्षा पुरी करत आहे तर तिची आई पुरी तळताना दिसत आहे आणि खुशबू ही बिर्याणी बनवताना दिसत आहे. त्याचबरोबर त्यांचा भाऊ त्यांना मदत करताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

आणखी वाचा – “औक्षण, पारंपरिक लूक, ढोल ताशांचा गजर अन्…”, दुबईकरांनी जल्लोषात केलं आदेश बांदेकरांचं स्वागत, त्याचक्षणी ‘ती’ व्यक्ती रडली आणि…

एकूणच या व्हिडीओत तावडे कुटुंबीय अगदी आनंदाने स्वयंपाक करताना दिसत आहेत. यामुळे त्यांच्यातील चांगला बॉण्डदेखील दिसून येत आहे. त्यांच्यातील हा बॉण्ड चाहत्यांनादेखील आवडला असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओखाली अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांच्या जेवण बनवण्याच्या आनंदात स्वत:ला ही सहभागी करून घेतले आहे. नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये ‘किती गोड’, त्याचबरोबर आनंदी आणि हार्टचे इमोजीस् देत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावचा नवराही आता चित्रपटात काम करताना दिसणार, रुपेरी पडद्यावर दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळणार

दरम्यान तितिक्षा व खुशबू या दोघीही मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. तितिक्षा सध्या ‘झी मराठी’वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी गोष्ट’ या मालिकेत नेत्राची भूमिका करत आहे तर खुशबू ही ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. दोघीही सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांबरोबर फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात.

Tags: entertainment newskhushboo tawdemarathi actressmarathi entertainmenttiteeksha tawde
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Tiger 3 box office collection day 2

सलमान खानचा ‘टायगर ३’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये तुफान गर्दी, 'जवान'चाही मोडला रेकॉर्ड, आतापर्यंत कमावले तब्बल इतके कोटी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.