‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. जेव्हा ही मालिका सुरु झाली, तेव्हापासूनच अनेक रंजक वळणे प्रेक्षकांना यात पाहायला मिळाली. मालिकेचे कथानक, नेत्रा-अद्वैतची सुंदर केमिस्ट्री आणि इतर पात्रांना प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळत आहे. तसेच, नेत्राला दिसणारा भूतकाळ आणि त्यापुढे घडणाऱ्या काही घटना प्रेक्षकांना पाहायला नेहमीच रंजक वाटतात. मालिकाचा महत्वाचा सीनच्या शूटसाठी कलाकार जशी मेहनत घेतात, तसेच पडद्यामागील कलाकार देखील तो सीन चांगला यावा, यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून ज्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहे. (Satvya mulichi satvi mulgi BTS)
मालिकेत इंद्रायणी हे पात्र साकारणारी अभिनेत्री श्वेता मेहेंदळे हिने या मालिकेचे काही BTS व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केले. एका जंगलात या मालिकेचा हा सीन भर रात्री शूट होत असल्याचं यात पाहायला मिळत आहे. यातील पहिल्या व्हिडीओमध्ये त्या सेटजवळ आग लागल्याचं पाहायला मिळते. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये काही जण ती आग विझवताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एकही कलाकार दिसत नसले, तरी पडद्यामागील कलाकारांची ही मेहनत यावेळेस पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा – “बाबा रिक्षा पळव म्हणाला अन्…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला लेकाच्या जन्मावेळीचा प्रसंग, म्हणाली, “स्वामी नक्कीच…”

याआधी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा याच मालिकेतील एका BTS व्हिडिओची बरीच चर्चा झाली होती. ज्यामध्ये त्या खड्ड्यात कोसळताना दिसत आहे. त्यावेळी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं चाहत्यांनी कौतुक केलं होतं. तसेच मालिकेतील याआधीच्या प्रत्येक BTS व्हिडीओचे चाहत्यांनी कौतुक केले होते.
हे देखील वाचा – मराठी मालिकेत अपघात सीन असे होतात शूट, थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, अभिनेत्री हवेत लटकत होती अन्…
मालिकेच्या येणाऱ्या भागात नेत्रा आणि इंद्रायणीला पंचपीटिका रहस्यातील पहिली पेटी सापडताना पाहायला मिळणार आहे. पेटी सापडल्यानंतर त्या दोघी ते घेऊन जेव्हा राजाध्यक्षांच्या घरी येतात. तेव्हा रुपाली ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करत असते. मात्र, तिला यात अपयश आल्यानंतर अखेर नेत्रा व इंद्रायणी ती पेटी त्रिनयना देवीच्या ग्रंथसाहित देवीच्या मंदिरात ठेवण्याचं ठरवतात. पण ते घेऊन जाताना नेमकी ती पेटी इंद्रायणीच्या रक्ताने ऐनवेळी उघडत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता पुढील भागात नेमकं काय पाहायला मिळणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.