शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बाबा रिक्षा पळव म्हणाला अन्…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला लेकाच्या जन्मावेळीचा प्रसंग, म्हणाली, “स्वामी नक्कीच…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 8, 2023 | 4:51 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
swati deval share a post for her son birthday

"बाबा रिक्षा पळव म्हणाला अन्...", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला लेकाच्या जन्मावेळीचा प्रसंग, म्हणाली, "स्वामी नक्कीच..."

मराठी मालिका विश्वातील अभिनेत्री स्वाती देवल हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘कुंकू’, ‘कळत नकळत’, ‘पुढचं पाऊल’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये तिने काम केलेलं आहे. मात्र, ‘झी मराठी’वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील मिनाक्षी या पात्रातून तिला मोठी लोकप्रियता मिळाली. या मालिकेत जरी ती खलनायिकेचं पात्र साकारत असली, तरी तिच्या या पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं होतं. सध्या ‘सोनी मराठी’वरील ‘राणी मी होणार’ मालिकेत ती महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत असून तिच्या या भूमिकेला चाहत्यांची पसंती मिळत आहे. (swati deval share a post for her son birthday)

स्वाती अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असून ती याद्वारे अनेक फोटोज व व्हिडीओज शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. नुकताच तिने तिच्या लोकांसाठी एक व्हिडीओ शेअर केला. जो सध्या व्हायरल होत आहे. स्वातीने संगीत संयोजक तुषार देवलशी लग्न केलं. या दोघांना ‘स्वराध्य’ नावाचा मुलगा आहे. आज स्वराध्यचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त स्वातीने इंस्टाग्रामवर एक कोलाज व्हिडीओ शेअर करत त्याला वाढदिवसाचा शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा – ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, ज्ञानदा रामतीर्थकर झाली भावुक, म्हणाली, “‘कानिटकर वाडा’…”

View this post on Instagram

A post shared by Swati Deval (@swati.deval)

स्वातीने या व्हिडिओला कॅप्शन देत म्हणाली, “पहाटे डॉक्टरने माझ्या हातात एक छोटंसं बाळ आधी माझ्या गालावर आणि नंतर हातात दिलं. तुझं हे छोटंसं रूप मी अजूनही डोळ्यात साठवलेलं आहे. तू माझ्याशी ओळख पटवायचा प्रयत्न करत होता. की ही आपुलकीने जवळ घेणारी बाई कोण? तुला काळत नव्हतं की हिच्या कुशीत गेल्यावर मी का रडायचा थांबलो. एवढीशी नाजूक मूर्ती पाहून तुला हाताळताना भीती वाटत होती. फार साजिरं रूप, तेज, माझ्या स्वामी आबाचं पिल्लू. बाबा विमानतळावर उतरताच त्याला जेव्हा ही बातमी कळाली, तेव्हा तो रिक्षाचालकाला म्हणाला, ‘मित्रा, मी बाबा झालो… चल रिक्षा पळव, मला मुलाला पाहायचं आहे.’ आणि रुग्णालयात येताच तुला पाहिल्यावर तो थबकला. किती तो वेगळा अनुभव, आनंद तू दिलास. अचानक तुला अनेक जण मी मामा, मामी, आजी, आजोबा अशी नाती सांगून गेले. तर तू त्यांना जीभ बाहेर काढून हसवलंस.”

हे देखील वाचा – Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे व ऐश्वर्या शर्मामध्ये जोरदार भांडण, जोडीदारांनीही डोक्याला लावला हात, अभिनेत्रीचा स्वतःवरील ताबा सुटला अन्…

View this post on Instagram

A post shared by @theswaraadhydeval

“खूप काही लिहायचं, पण ठीक आहे. तूझ्या जीवनात ही खूप आनंद, यश, प्रेम, कीर्ती, चांगलं आरोग्य तुला मिळो. सगळ्या वाईट गोष्टी, वाईट विचार, माणसे यांच्यापासून स्वामी तुला नक्की दूर ठेवतील, हा माझा विश्वास आहे. तू चांगला माणूस हो. आमचे अनुभव, संस्कार, आशिर्वाद तुझ्याबरोबर कायम राहतील. बाळा मनापासून प्रेम.”, असं ती या पोस्टमध्ये म्हणाली. तिच्या या पोस्टवर कलाकारांसह चाहत्यांनी कमेंट करत स्वराध्यवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Tags: marathi actressmazi tuzi reshimgathrani mi honarsony marathiswati devalswati deval share a post for her son birthdaytushar deval
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Shikhar approves his relationship janhvi

जान्हवी कपूरच्या अफेअरची जोरदार चर्चा, सुशील कुमार शिंदेंच्या नातवाला डेट करत असल्याचं पक्कं, 'त्या' कमेंटने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.