शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आयुष्यभर टॅक्सी ड्रायव्हरचं काम केलं अन्…”, ७२ लाखाची बीएमडब्ल्यू कार घेतलेली पाहून भरत जाधव यांचे वडील म्हणाले, “पैसे चुलीत घाल पण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 8, 2023 | 6:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bharat Jadhav Shared Incident

"आयुष्यभर टॅक्सी ड्रायव्हरचं काम केलं अन्…", ७२ लाखाची बीएमडब्ल्यू कार घेतलेली पाहून भरत जाधव यांचे वडील म्हणाले, "पैसे चुलीत घाल पण…"

मराठी सिनेसृष्टीतील बरीच अशी कलाकार मंडळी आहेत ज्यांनी आजवर स्वमेहनतीने शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. ही कलाकार मंडळी अभिनयाचा कोणताही वारसा नसताना केवळ आपल्या कलेच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण करतात. यांत एका विनोदवीराचं नाव आवर्जून घेतलं जाईल ते म्हणजे अभिनेते भरत जाधव. आजवर भरत जाधव यांनी अतिशय कष्टाने डोलारा उभा केला आहे. सिनेसृष्टीत त्यांनी स्वतःच्या अभिनय कौशल्याने चाहतावर्ग निर्माण केला आहे. (Bharat Jadhav Shared Incident)

पहिली व्हॅनिटी व्हॅन, पहिली मर्सडिज घेणारा हा मराठी सिनेसृष्टीतील पहिला कलाकार असे अनेक रेकॉर्ड्स आजवर भरत जाधव यांच्या नावे आहेत. त्यांच्या गाडीचा एक किस्सा भरत जाधव यांनी ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्टा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. त्यावेळी बोलताना भरत जाधव म्हणाले की, “काम समोर दिसलं की मी कर्ज घ्यायचो. कोणतीही ब्रँडची गाडी घेतली तर त्या प्रत्येक ब्रँडच्या गाडीचं स्टेरिंग माझ्या वडिलांच्या हातात असावं असंच मला वाटायचं. शिवाय मी जेवढ्या पण गाड्या घेतल्या त्या सर्व कर्ज घेऊनचं घेतल्या आहेत आणि काम करून ते कर्जही फेडलं आहे. नाटकात येण्याआधीपासून माझी एक सवय होती, जमीन दिसली की विचारायचं ‘काय रेट चालला आहे?’. फक्त एवढीच माझी सवय होती.”

आणखी वाचा – मराठी मालिकेत अपघात सीन असे होतात शूट, थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, अभिनेत्री हवेत लटकत होती अन्…

View this post on Instagram

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

यापुढे बोलताना ते म्हणाले, “मी मराठी कलाकार आहे तर असे कितीसे पैसे माझ्या खिशात असणार. आणि मी घेतलेली पहिली व्हॅनिटी व्हॅन ही माझी गरज होती, म्हणून ती माझ्याजवळ आहे. एकदा मी कोल्हापूरला जाताना बीएमडब्ल्यू एक्स ५ घेऊन गेलो होतो. जेव्हा त्यांच्या हातात स्टेरिंग दिलं तेव्हा ते गेअर शोधायला लागले. मी म्हटलं याला गेअर नसतो ही ऑटोमॅटिक आहे. त्यावर वडील म्हणाले, “कसली गाडी घेतलीय. ड्रायव्हरला गेअर पाहिजे. ड्रायव्हरला गेअरशिवाय गाडी चालवायला मज्जा नाही.”

आणखी वाचा – “बाबा रिक्षा पळव म्हणाला अन्…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला लेकाच्या जन्मावेळीचा प्रसंग, म्हणाली, “स्वामी नक्कीच…”

गेअरशिवाय गाडी चालवायला मजा नाही हे ऐकून भरत जाधव चकित झाले. आणि म्हणले, “मी ७२ लाखाला ही गाडी घेतली आहे. ते चुलीत घाल पैसे त्याला काही महत्त्व नाही असं ते काहीच विचार न करता म्हणाले. त्यावेळी त्यांनी हा विचारपण केला नाही की, मी किती रक्कम बोलत आहे. आयुष्यभर टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केलं त्यामुळे गाडीला गेअर असणं असं त्यांच्या दृष्टीने महत्वाचं होतं”.

Tags: bharat jadhavbharat jadhav on carentertainmentmarathi actressmarathi drama
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
tharla tar mag serial celebration for completed 300 episodes

'ठरलं तर मग' मालिकेचे ३०० भाग पूर्ण, केक कट करत सेटवर जंगी सेलिब्रेशन, टीआरपीमध्येही अव्वल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.