शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या दोन वर्षांनंतर रिचा चड्ढा व अली फजल आई-बाबा होणार, हटके अंदाजात सांगितली गरोदर असल्याची बातमी, म्हणाले, “आता आम्ही…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 9, 2024 | 12:43 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Actress richa Chadha and actor ali fazal expecting first baby see pregnancy announcement post

लग्नाच्या दोन वर्षांनंतर रिचा चड्ढा व अली फजल आई-बाबा होणार, हटके अंदाजात सांगितली गरोदर असल्याची बातमी, म्हणाले, "आता आम्ही..."

हिंदी सिनेसृष्टीतून नुकतीच यामी गौतम प्रेग्नंट असल्याची बातमी आली होती. अशातच आता अभिनेत्री रिचा चड्ढा व अभिनेता अली फजल हेदेखील आई-वडील होणार असल्याची खुशखबर समोर येत आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रिचा चड्ढा व अली फजल यांनी २०२२ मध्ये लग्न केले आणि आता हे दोघे पालक होणार आहेत. रिचा व अली यांनी स्वत: सोशल मीडियावर एका खास पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. 

रिचा चड्ढा व अली फजल यांनी इन्स्टाग्रामवर एक खास पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. यामध्ये पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी “१ + १ = ३” असं लिहिलं आहे. तसेच दुसऱ्या पोस्टमध्ये रिचा व अली यांनी त्यांचा एकत्र फोटो शेअर केला आहे. हे खास फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये असं “लहान मुलाच्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज आपल्या जगात सर्वात मोठा आहे” असं लिहिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by ali fazal (@alifazal9)

आणखी वाचा – “कुणीतरी आपले कष्टाचे पैसे चोरतो…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीने उघडकीस आणला फसवणुकीचा प्रकार, म्हणाली, “अकाऊंटला पैसे आले अन्…”

तसेच रिचा चड्ढाने अली फजलबरोबरचा एक फोटोही पोस्ट केला आहे, ज्यामध्ये एका प्रेग्नंट स्त्रीचा इमोजीही पोस्ट केला असल्याचे पाहायला मिळत आहे. रिचा-अली यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद, श्रिया पिळगावकर, हिमांशी चौधरी, नताशा भारद्वाज, हर्षित शेखर गौर यासंह अनेक कलाकार मंडळींनी व चाहत्यांनी कमेंट्सद्वारे त्यांचे अभिनंदन केले आहे. 

आणखी वाचा – “ब्रेकअपबद्दल बोलणं…”, एक्स गर्लफ्रेंडने बदनामी केल्यानंतर भडकला अरबाज खान, म्हणाला, “२ वर्षांपूर्वीच…”

दरम्यान, रिचा चड्ढा व अली फजल यांनी ४ ऑक्टोबर २०२२ रोजी एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली होती. त्यांनी दिल्लीत त्यांच्या लग्नाचा प्री-वेडिंग सोहळा केला होता. त्यानंतर लखनऊमध्ये मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांचा भव्य विवाहसोहळा पार पडला. मग रिचा-अलीने मुंबईत रिसेप्शन पार्टीही आयोजित केली होती.

Tags: Ali Fazalbollywood actorbollywood actressBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsRicha Chadhaअली फजलबॉलिवूड अभिनेताबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमीरिचा चड्ढा
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
Shivani Surve and Ajinkya Nanaware

लग्नानंतर हनिमूनला पोहोचले शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरे, शेअर केला रोमँटिक व्हिडीओ, म्हणाला, "माझ्या बायकोची…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.