बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अभिनेता अरबाज खान हा कायम त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. गेल्या वर्षी २४ डिसेंबर रोजी अर्पिता खानच्या घरी या अरबाज व शुरा खान यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. मलायका अरोरापासून विभक्त झाल्यानंतर जवळपास ६ वर्षांनी अरबाजने शुराबरोबर त्याचा दूसरा संसार थाटला आहे. याआधी तो जॉर्जिया अँड्रियानीबरोबर रिलेशनमध्ये होता. त्याच्या लग्नांतर जॉर्जियाने अरबाजच्या लग्नाबाबत एका मुलाखतीद्वारे भाष्य केलं होतं.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत जॉर्जियाने “वेगळे होण्याचा निर्णय घेण्यासाठी आम्हाला खूपच वेळ लागला. मला अरबाज अजूनही आवडतो आणि आम्ही यापुढेही चांगले मित्र राहू” असं म्हटलं होतं. यावर आता अरबाजने भाष्य केलं आहे. “आमच्यामध्ये शेवटपर्यंत सर्व काही ठीक होते, असं सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात तसे काही नव्हते. लग्नापूर्वीची ही मुलाखत अनावश्यक आणि अयोग्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा – नम्रता संभेरावच्या लेकाची पहिली इंटरनॅशनल टूर, सिंगापूरमध्ये भन्नाट करामती अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल
‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत अरबाजने असं म्हटलं आहे की, “दोन वर्षांपूर्वी जॉर्जिया आणि माझे ब्रेकअप झाले होते. मी त्यावेळी शुराला भेटलोही नव्हतो. त्यामुळे माझ्या लग्नाच्या काही दिवस आधी आमच्या ब्रेकअपबाबत मुलाखती देणं मला योग्य वाटलं नाही. आमच्यामध्ये शेवटपर्यंत सर्व काही ठीक होते असं सांगण्यात आले होते, परंतु हे खोटे आहे. आमच्या नात्याबद्दल मला स्पष्टीकरण द्यावे लागणे हे खूप दुर्दैवी आहे. शुराला भेटण्यापूर्वीच माझे पूर्वीचे नाते संपले होते. शुरा माझ्या आयुष्यात आल्यामुळे मी माझे आधीचे संपवले असे लोकांना वाटत आहे, पण तसे अजिबात नाही.”
यापुढे अरबाजने असं म्हटलं आहे की, “मी लग्न करताना किंवा माझ्या लग्नानंतर ब्रेकअपबद्दल बोलणे ही चुकीची गोष्ट आहे. जर ब्रेकअप २ वर्षांपूर्वीच झाला आहे, तर त्याबद्दल तेव्हाच बोलले पाहिजे होते. त्याबद्दल आता बोलणे योग्य नाही. तसेच मुलाखतीमधून ब्रेकअपबद्दलच्या कालावधीची चुकीची माहिती देणं हेही चूक आहे. त्यामुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल वक्तव्य करताना सावधगिरी बाळगली पाहिजे.”