Bigg Boss 17 Upadte : ‘बिग बॉस १७’ च्या घरात पहिल्या दिवसापासूनच कायम चर्चेत राहिलेले स्पर्धक म्हणजे अंकिता अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन. हे दोघे शोच्या पहिल्या दिवसापासूनच कायम चर्चेत राहिले आहेत. ‘बिग बॉस’मध्ये येणारे शो हे प्रेक्षकांना काही नवीन नाहीत. अशातच या शोमध्ये विक्की जैनच्या आईच्या म्हणजेच अभिनेत्रीच्या सासूच्या एण्ट्रीने एक आणखी नवीन ट्विस्ट आणला आहे. शोमधून बाहेर पडल्यानंतर अंकिताच्या सासूबाईंनी अशा कमेंट केल्या होत्या की, यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केल्या. अंकिताची मैत्रीण रश्मी देसाईनेही नुकतीच इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे विकी जैनची आई रंजना जैन यांच्यावर संताप व्यक्त केला होता.
अशातच आता पुन्हा रश्मीने अंकिताच्या आईवर निशाणा साधला आहे. विकी जैनच्या आईने अभिनेत्री पत्नी पाहिजे असेल तर तिचे नखरे झेलावेच लागतील. तिच्यावर खर्च करावाच लागेल, अशा आशयाचे विधान केले होते. यावरुन त्यांच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर त्या टीकेच्या धनी झाल्या आहेत. अशातच आता रश्मी देसाईनेदेखील त्यांच्या विधानावर इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे तिचे मत परखडपणे मांडले आहे.
रश्मीने तिच्या स्टोरीद्वारे असे म्हटले आहे की, “माफ करा आंटी. तिला हा शो कधीच करायचा नव्हता. विकी जैनच्या प्रेमापोटी तिने हे केले आहे आणि खर्च झेलावा लागतो म्हणजे काय? त्या दोघांनी प्रेमविवाह केला आहे आणि त्यापूर्वीही ती रस्त्यावर राहत नव्हती. ‘बिग बॉस’ने तुमच्या मुलावर पैसे गुंतवले तरीही ती पण अंकिता लोखंडे आहे. प्रत्येकाची स्वतःची लढाई आहे. पण त्यांचे लग्न टिकू नये असे तुम्हाला वाटते का?.”
यापुढे तिने असं म्हटले आहे की, “प्रत्येक पती-पत्नीमध्ये भांडणे होतात आणि हा शोदेखील कठीण आहे. २ दिवसांत तुमची ही स्थिती आहे. जर तुम्ही ४ महिने सोसलत, तर तुम्हाला नेमकी समस्या समजेल. मला तुमच्याबद्दल आदर आहे आणि मी तो नेहमी करीन. पण तुम्ही इथे चुकत आहात.” दरम्यान, अंकिताच्या सासूने तिच्यावर केलेल्या आरोपांमुळे विकी जैनच्या आईवर अनेक माध्यमांधून प्रतिक्रिया येत आहेत.