बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दहा वर्षांपूर्वी अशी दिसायची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात, चाहत्यांनाही ओळखता येईना, फोटो व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 11, 2024 | 8:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vanita Kharat Childhood Photo

दहा वर्षांपूर्वी अशी दिसायची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात, चाहत्यांनाही ओळखता येईना, फोटो व्हायरल

कलाक्षेत्रातील मंडळींचा कलाकार होण्यापर्यंतचा प्रवास काही सोप्पा नसतो. प्रत्येकजण आपापल्या मेहनतीने त्यांच्या या क्षेत्रातील प्रवास पूर्ण करत असतात. बरेच कलाकार असे असतात ज्यांचा या क्षेत्रात कुणीही गॉडफादर नसतो, मात्र हे कलाकार स्वमेहनतीने स्वतःचं स्थान स्वतः निर्माण करतात. अभिनयक्षेत्रात येण्याची आवड त्यांना शांत बसू देत नाही तेव्हा कॉलेज विश्वामध्ये, शालेय जीवनात ही कलाकार मंडळी अभिनय क्षेत्राशी निगडित स्पर्धांमध्ये भाग घेत स्वतःला सिद्ध करत असतात. (Vanita Kharat Childhood Photo)

अशीच एक अभिनेत्री जिने या सिनेक्षेत्रात स्वतःचं स्थान स्वतः निर्माण केलं आहे. ती अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. वनिता खरातचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. वनिता खरात ही छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचली. ‘कोळीवाड्याची रेखा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनिताने तिच्या दमदार अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहे. त्यामुळेच आज तिचा स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. वनिताने केवळ मालिकेपुरतं मर्यादित न राहता आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला आणि त्यात प्रेक्षकांची मने जिंकण्यात तिला यश आले.

आणखी वाचा – Video : ‘तू चाल पुढं’ला निरोप देताना दिपा परबला रडू कोसळलं, हातात गणपतीची मुर्ती घेतली अन्…; व्हिडीओ पाहून प्रेक्षकही भावुक

View this post on Instagram

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

सोशल मीडियावरही वनिता खरात बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही पोस्ट करुन चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वनिताने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने तब्बल दहा वर्ष जुना फोटो शेअर केला आहे. या पोस्टला तिने “या वनिताला आज खूप आनंद होत असेल” असं कॅप्शन दिलं आहे. वनिताने शेअर केलेला हा फोटो एकपात्री अभिनय स्पर्धेतील आहे.

आणखी वाचा – “माता सीताही श्रीराम यांच्यासह असाव्यात”, राम मंदिराच्या उद्घाटनाचं आमंत्रण मिळाल्यानंतर ‘रामायण’मधील सीतेचं वक्तव्य, म्हणाल्या, “फक्त एकच मुर्ती…”

दहा वर्ष जुना फोटो शेअर करत तिने तिच्या अभिनयक्षेत्राच्या प्रवासाच्या सुरुवातीची आठवण शेअर केली आहे. तिच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट व लाईक्सच्या वर्षाव केला आहे. समीर चौघुले यांनी कमेंट करत म्हटलं आहे की, “क्या बात है वनिता, खूप प्रेम आणि शुभेच्छा” असं म्हटलं आहे. तर ऋतुजा बागवे, अक्षया नाईक, रसिका वेंगुर्लेकर या कलाकारांनी तिच्या या फोटोवर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.

Tags: entertainmentmaharashtrachi hasyajatramarathi actressvanita kharatvanita kharat instagramvanita kharat post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
marathi actress shruti marathe talked about her casting couch experience see the details

“मी तुमच्याबरोबर झोपले तर…”, मराठीत विचित्र मागणी करणाऱ्याला श्रुती मराठेचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “तुमची बायको मुख्य अभिनेत्यासह…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.