शुक्रवार, सप्टेंबर 11, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी तुमच्याबरोबर झोपले तर…”, मराठीत विचित्र मागणी करणाऱ्याला श्रुती मराठेचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “तुमची बायको मुख्य अभिनेत्यासह…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 12, 2024 | 9:30 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi actress shruti marathe talked about her casting couch experience see the details

“मी तुमच्याबरोबर झोपले तर…”, मराठीत विचित्र मागणी करणाऱ्याला श्रुती मराठेचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “तुमची बायको मुख्य अभिनेत्यासह…”

मराठी सिनेसृष्टीतील काही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून श्रुती मराठेची गणना केली जाते. नाटक, मालिका, जाहिरात व चित्रपट अश्या अनेक माध्यमांतून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. केवळ मराठीच नव्हे तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतदेखील श्रुतीने काम केले आहे. ‘राधा ही बावरी’ या गाजलेल्या मालिकेतून श्रुती लोकप्रिय झाली. श्रुती तिच्या अभिनयासह रोखठोक भूमिकेमुळेसुद्धा कायमच लक्षात राहिली आहे. श्रुतीने नुकतीच एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी तिने तिला आलेल्या कास्टिंग काऊचचा अनुभवदेखील व्यक्त केला.

‘आरपार’ या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत श्रुतीने मराठीमध्ये तिला आलेल्या कास्टिंग काऊचबाबतच्या अनुभवाविषयी सांगितलं. यावेळी तिच्या या अनुभवाविषयी सांगताना श्रुती असं म्हणाली की, “अनेक वर्षांपूर्वी मला मराठीमध्ये कास्टिंग काऊचचा अनुभव आला. अगदी नवीन होते असंही नाही. मला काम करुन काही वर्ष झाले होते. आपल्या इंडस्ट्रीबाबत गैरसमज आहेत का? हे मला माहित नाही. पण बऱ्याच जणांना असं वाटतं की, अभिनेत्री उपलब्ध असतात. अभिनेत्री उपलब्ध असतात हे ऐकायलाच खूप घाण वाटतं. हे कोणी पसरवलं?, कुठून सुरु झालं?. एखादं काम करण्यासाठी अमुक गोष्टी कराव्याच लागतील हे कुठून आलं?”.

View this post on Instagram

A post shared by Shruti Marathe Fan Club (@team_shruti)

आणखी वाचा – दहा वर्षांपूर्वी अशी दिसायची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात, चाहत्यांनाही ओळखता येईना, फोटो व्हायरल

“मला अजूनही आठवतं की, एका चित्रपटासाठी मला फायनान्सर भेटायला आले होते. चित्रपट करायचा वगैरे असं आमचं बोलणं झालं. मग त्यांनीच मला विचारलं की, तुझं मानधन काय आहे? मी माझं मानधन सांगितलं. तर त्यावेळी मला ते बोलले जर तू माझ्याबरोबर काही गोष्टी केल्यास तर तुला तू जे मानधन सांगितलं आहेस ते मिळेल. हे ते मला तोंडावर बोलले. दोन ते तीन मिनिटांसाठी मला काही कळेना. मला घाम फुटायला लागला”.

आणखी वाचा – “मी खूप कुचका व किचकिच करणारा माणूस म्हणून…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर आनंद इंगळेंचं भाष्य, म्हणाले, “वैयक्तिक आयुष्यावर…”

यापुढे ती असं म्हणाली की, “माझ्याबरोबर हे असं कधीच झालं नव्हतं. ही वेळ कशी सांभाळावी मला समजत नव्हतं. यावर काहीतरी उत्तर दिलं पाहिजे असा मी तेव्हा विचार केला. तेव्हा मी या भाषेमध्ये त्याच्याशी बोलले की, “मी जर तुमच्याबरोबर झोपले तर तुमची बायको मुख्य अभिनेत्याबरोबर झोपणार का?”. माझं उत्तर ऐकून त्याचं असं झालं की, काय बोलत आहेस तू?. तेव्हा मी त्याला विचारलं मी असं काहीतरी करते ही माहिती तुम्हाला कुठून मिळाली?” त्यामुळे श्रुतीला आलेला हा अनुभव खरंच थक्क करणारा होता. दरम्यान, श्रुती ही एक अभिनेत्री असण्याबरोबरच एक निर्मातीदेखील आहे. ‘नवा गडी नवं राज्य’ या लोकप्रिय मालिकेची ती निर्माती होती.

Tags: श्रुती मराठेमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी मनोरंजनमराठी बातमीentertainment newshruti Marathemarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
actress rashmi desai slams ankita lokhande mother in law statements in bigg boss see the details

Bigg Boss 17 : "ती काही रस्त्यावर राहत नव्हती…" अंकिता लोखंडेच्या सासूवर भडकली रश्मी देसाई, म्हणाली "त्यांचं लग्न टिकू नये असं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.