शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“जेव्हा मराठा लढतो तेव्हा…”, मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “इतिहास…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 27, 2024 | 12:40 pm
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
Actress Prajakta Gaikwad shared special post celebrating the victory of Maratha reservation see the details

"जेव्हा मराठा लढतो तेव्हा…", मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, "इतिहास…"

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात मराठा आरक्षण हा अत्यंत चर्चेचा विषय आहे. गेले अनेक दिवस या विषयावर राज्यभरात खूपच चर्चा सुरु होती. पण अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या मराठा समाजाचा आरक्षणाचा तिढा अखेर सुटला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये सध्या आनंदाच व उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी पेढे वाटप व गुलाल उधळला जात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या या विजयी निर्णयावर सामान्य व्यक्तीसह कलाकारांकडूनदेखील आनंद व्यक्त केला जात आहे.

नुकतीच ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे या अभिनेत्रीने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ एक खास पोस्ट शेअर करत त्यांना पाठींबा दर्शवला होता. याच मालिकेतील येसुबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनेदेखील जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती आणि आता मराठा आरक्षणाच्या विजयावरदेखील तिने आनंद व्यक्त केला आहे. प्राजक्ताने नुकताच तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमार्फत तिने तिचा आनंद व्यक्त केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Prajakta Gaikwad (@prajaktaa.gaikwad)

हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ फेम ‘या’ कलाकाराची नवीन मालिकेत वर्णी, खास व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात मराठा क्रांती मोर्चाच्या मंचावर भाषण देत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने “जेव्हा मराठा लढतो तेव्हा इतिहास घडतोच.” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर ‘मराठा’, ‘९६कुळी मराठा’, ‘एक मराठा लाख मराठा’, ‘जरांगे पाटील’, ‘मराठा आरक्षण’, ‘मराठा साम्राज्य’, ‘अभिमान’, ‘नाद’, ‘स्वराज्य’ असे अनेक हॅशटॅग देत आपल्या विजयाबद्दलच्या भावनादेखील व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेला जिंकण्यासाठी बॉलिवूडसह मराठी कलाकारांचा पाठिंबा, सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री म्हणाली…

दरम्यान, तिने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अनेक चाहत्यांनीदेखील कमेंट्सद्वारे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. इतिहास उलटून पाहाल तर विजय नेहमी आमच्यासोबत होता आहे राहिल, एक मराठा लाख मराठा, मराठा खड़ा तो सरकार से बड़ा, आज आपला लढा यशस्वी झाला” अशा अनेक कमेंट्सद्वारे त्यांचा अरक्षणाच्या विजयाचा अभिनेत्रीबरोबर आनंद साजरा केला आहे.   

Tags: entertainment newsMaratha ReservationMaratha Reservation Newsmarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsprajakta gaikwadप्राजक्ता गायकवाडमनोरंजन बातमीमराठा आरक्षणमराठा आरक्षण बातमीमराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

"लग्नाआधीही एकत्र राहिलो अन्…", विकी जैनला बायकोशिवाय करमेना, अंकिता लोखंडेला भेटायची ओढ, म्हणाला, "चुका होतात पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.