शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तब्येत सांभाळा नाहीतर…”, सूनबाईंवर जीवापाड प्रेम करतात मृणाल कुलकर्णी, फोटो पोस्ट करत म्हणाल्या, “मास्तरीन बाई…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 8, 2024 | 1:33 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Actress Mrinal Kulkarni has shared a special post praising daughter in law Shivani Rangole

"तब्येत सांभाळा नाहीतर...", सूनबाईंवर जीवापाड प्रेम करतात मृणाल कुलकर्णी, फोटो पोस्ट करत म्हणाल्या, "मास्तरीन बाई..."

मराठी मनोरंजन विश्वातील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी रांगोळे. शिवानी व विराजस अनेक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते आणि त्यानंतर दोन वर्षांपूर्वी त्यांनी एकमेकांना आयुष्याचं जोडीदार म्हणून निवडलं. विराजसची आई व प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची शिवानी यांच्या सासू-सुन या नात्यापेक्षा त्या एकमेकांच्या खूप छान मैत्रिणी आहेत. त्या दोघींमध्ये खूप छान बाँडिंग आहे आणि याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे.

‘झी मराठी’वर लवकरच दोन नवीन मालिका येणार आहेत. या मालिकांच्या प्रमोशनसाठी नुकतंच मृणाल कुलकर्णी यांनी सुनेसह एकत्र शूटिंग केलं. याचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शिवानी सतत शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने तिच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होत असल्याची चिंता मृणाल यांनी या पोस्टद्वारे व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी आपल्या लाडक्या सुनेला एक प्रेमळ सल्लादेखील दिला आहे.

आणखी वाचा – या आठवड्यात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी, ओटीटीवर पाहता येणार पाच वेगवेगळ्या सीरिज व चित्रपट, वाचा संपूर्ण यादी

मृणाल यांनी त्यांच्या फेसबुकवर सुनेसह खास फोटो शेअर करत “मास्तरीण बाई, काम झक्कास करताय. पण खाणं-पिणं आणि तब्येतही सांभाळा. नाहीतर आम्हीच शिकवू चांगला धडा!” असं म्हटलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांनी या पोस्टवर “मस्त बोलल्या सासूबाई, तुमच्या सूनबाई अतिशय सुंदर अभिनय करतात, कित्ती गोड हे रागावणे सासूबाई, किती मस्त, छान, समजून काम करते आहे.” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा – वाडा, तिथेच मंदिर अन्…; स्वत:च्या मूळ गावी पोहोचला संकर्षण कऱ्हाडे, अंबेजोगाईचं दर्शनही घेतलं, म्हणाला, “घरच्या मारुतीच्या…”

दरम्यान, शिवानी ही ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अक्षरा उर्फ मास्तरीण बाई हे पात्र साकारत आहे. लग्नानंतर ती या मालिकेच्या शूटिंगमध्ये पूर्णपणे व्यग्र आहे. त्यामुळे तिच्या सासूने तिच्याच मालिकेच्या शीर्षकावरुन एक प्रेमळ सल्ला दिला आहे. त्यामुळे या सासू-सुनेच्या जोडीचे चांगलेच कौतुक होत आहे.   

Tags: entertainment newsmarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsmrinal kulkarnishivani rangoleमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजनमृणाल कुलकर्णीशिवानी रांगोळे
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
ankita lokhande

बाथटब, बेडरुममधील रोमँटिक अंदाज अन्…; एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले अंकिता लोखंडे-विकी जैन, फोटो चर्चेत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.