बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बाथटब, बेडरुममधील रोमँटिक अंदाज अन्…; एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले अंकिता लोखंडे-विकी जैन, फोटो चर्चेत

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 8, 2024 | 2:18 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
ankita lokhande

बाथटब, बेडरुममधील रोमँटिक अंदाज अन्...; एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले अंकिता लोखंडे-विकी जैन, फोटो चर्चेत

‘बिग बॉस १७’ मुळे अभिनेत्री अंकिता लोखंडे व विकी जैन ही जोडी चर्चेत आली. अंकिता व विकी यांच्या येण्यामुळे यंदाचं ‘बिग बॉस’चं पर्व विशेष गाजलं. सततची भांडणं, वाद, यांमुळे ही जोडी चर्चेत राहिली. या भांडणांमुळेचं अंकिता व विकी यांच्यावरील चाहत्यांचं प्रेम काहीस कमी झालेलं पाहायला मिळालं. मात्र याउलट ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडल्यानंतर दोघेही एकमेकांसह वेळ घालवताना दिसत आहेत. एकत्र फिरतानाही दोघे दिसले. तसेच ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी एकत्र पार्टीही एन्जॉय केली. (Ankita Lokhande And Vicky Jain)

‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे पतीसह फिरायला गेली आहे. नुकतीच ती विमानतळावर स्पॉट झाली होती. ती पती विकी जैनसह सुट्टीसाठी जोधपूरला गेली आहे. आता अभिनेत्री तिच्या व्हॅकेशनचे व्हिडीओ व फोटो शेअर करताना दिसत आहे. अंकिता व विकीच्या सुट्टीचे व्हिडीओ व फोटो व्हायरल झाले आहेत. अभिनेत्रीने जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये मुक्काम केला आहे.

आणखी वाचा – Video : शेतात नवऱ्यासह कष्टाने भाज्या पिकवत आहे मृण्मयी देशपांडे, व्हिडीओ शेअर करत दाखवल्या फळभाज्या, चाहत्यांकडून कौतुक

अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा पती विकी जैन झोपलेला दिसत आहे. अंकिताने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती रिलॅक्स व मज्जा-मस्ती करण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये अंकिता व विकी ड्रेसिंग गाऊन घालून सेल्फी घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ विकीने बाथरूममधून बनवला आहे, यांत अंकिताही पोज देत आहे. यावेळी विकीने आलिशान बाथरूमची झलकही दाखवली आहे.

आणखी वाचा – या आठवड्यात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी, ओटीटीवर पाहता येणार ‘या’ पाच वेगवेगळ्या सीरिज व चित्रपट, वाचा संपूर्ण यादी

अंकिता व विकी ‘बिग बॉस १७’ या शोमधून बाहेर पडल्यानंतर पहिलाच एकत्र प्रवास करत आहेत. शोमधून बाहेर आल्यानंतर दोघेही सतत पार्टी करताना दिसले. आता दोघांनी स्वतःसाठी वेळ काढला आहे आणि क्वालिटी टाइम घालवण्यासाठी सुट्टीवर गेले आहेत. अंकिता आणि विकीची जोडी चाहत्यांना खूप आवडते.
‘बिग बॉस’मध्ये अंकिता व विकी खूप चर्चेत होते. विकी टॉप सहामध्ये तर अंकिता लोखंडे टॉप चारमध्ये होती. या दोघांनीही या शोमध्ये चांगली कामगिरी केली.

Tags: ankita lokhandeankita lokhande and vicky jainankita lokhande vacation modeentertainmentvicky jain
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Mugdha Vaishampayan Sister

"कित्येक रात्र न झोपता…", पदवी, गोल्ड मेडलसाठी इतके कष्ट करत होती मुग्धा वैशंपायन, बहिणीने सांगितला प्रवास, म्हणाली, "तू स्वतःला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.