‘झी मराठी’ वाहिनीवर एकापेक्षा एक मालिका येत असून या मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसत आहेत. या मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. गेल्या काही महिन्यात ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘पारू’, ‘शिवा’, ‘लाखात एक आमचा दादा’ अशा बऱ्याच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यामुळे मालिकांच्या टीआरपीला घेऊन चांगलीच चढाओढ सुरु असलेली पाहायला मिळत आहे. यातच भर घालत आता आणखी एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. ही मालिका म्हणजे ‘सावळ्याची जणू सावली’. (Megha Dhade New Serial)
या मालिकेचे दोन प्रोमो काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आले आणि या प्रोमोला प्रेक्षकांनी भरभरुन पसंती दर्शविली. यानंतर आता आणखी एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या मालिकेत ‘काव्यांजली’ फेम प्राप्ती रेडकर महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. यानंतर आता नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीची झलक पाहायला मिळाली.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये अभिनेत्री भाग्यश्री दळवी ‘मन मंदिरा’ हे गाणं गाताना दिसत आहे. प्रोमोमध्ये भाग्यश्री फक्त गाण्याची नक्कल करताना दिसत आहे तर प्राप्ती गाण्याची नक्कल करत आहे. “या आवाजाचा मी खूप मोठा फॅन आहे”, असं अभिनेता साईंकित कामत बोलतो. तेव्हा प्राप्ती तिचे आभार मानायला जाणार इतक्यात अभिनेत्री अभिनेत्री मेघा धाडे हिची एण्ट्री होते. प्राप्ती आभार मानायला जाणार इतक्यात मेघा धाडे तिचं तोंड बंद करायला जाते.
आणखी वाचा – प्रसाद ओकला लेकाने २२व्या वर्षी गिफ्ट केली महागडी कार, मंजिरी ओक भावुक, म्हणाली, “आज बाबाच्या चेहऱ्यावर…”
“तुला काय वाटलं, हा टाळ्यांचा कडकडाट, ही प्रशंसा सगळी तुझ्यासाठी? तुझा आवाज माझ्या मुलीसाठी माझ्याकडे गहाण ठेवलाय, हे कायम लक्षात ठेवायचं”, असं म्हणत मेघाची एण्ट्री पाहायला मिळत आहे. यावरुन मेघाचं हे मालिकेतील पात्र हे खलनायक असल्याचं समजत आहे. मेघाला खलनायिकेच्या भूमिकेत बघून तिच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. प्रोमो पाहून सगळेच तिचं भरभरुन कौतुक करताना दिसत आहेत.