अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या मोठ्या प्रमाणात असलेली पाहायला मिळते. आजवर ती अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसून आली आहे. तिने शाहरुख खान, सलमान खान, आमीर खान तसेच इतर अनेक दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम करताना दिसली आहे. मात्र दीर्घ कालावधीपासून ती अभिनय क्षेत्रापासून दूर असलेली पाहायला मिळत आहे. मात्र आयपीएल सामन्यादरम्याने ती नेहमी दिसून येते. ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ या संघाची ती मालकिण असल्याने ती संघाला नेहमी प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असते. तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील अधिक चर्चेत असलेली पाहायला मिळते. (Preity Zinta on IVF treatment)
प्रीती २०१६ साली ती जीन गुडइनफबरोबर लग्नबंधनात अडकली. त्यानंतर २०२१ साली सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांचे आई बाबा झाले. जय व जिया अशी त्यांच्या मुलांची नावं ठेवण्यात आली. मात्र याआधी प्रीतीने आई होण्यासाठीदेखील प्रयत्न केला, तिने आयव्हीएफच्या माध्यमातून गरोदर राहण्यासाठी प्रयत्न केले होते. याबद्दल ती आता व्यक्त झाली आहे.
प्रीती सरोगसीद्वारे जुळ्या मुलांची आई झाली होती. मात्र त्याआधी तिने आयव्हीएफद्वारे ट्रीटमेंट घेतली होती. ‘वोग इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने झालेल्या त्रासाबद्दल भाष्य केले आहे. ती म्हणाली की, “माझ्याही आयुष्यातही खूप वाईट दिवस आले. जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ असते तेव्हा आयुष्यात नेहमी खुश राहणं आणि भाग्यवान असणं हा एक मोठा संघर्ष असतो. मला माझ्या आयव्हीएफ दरम्यान झालेल्या त्रासावेळी सगळं जाणवलं होतं”.
पुढे ती म्हणाली की, “प्रत्येक वेळी मला चेहऱ्यावर हास्य ठेवणं आणि चांगलं वागणं खूप कठीण होतं. कधी कधी तर मला भिंतीवर डोकं आपटून रडावसं वाटायचं. मला कोणाशीही बोलावसं वाटायचं नाही. तसेच मी यावेळी मला खूप मानसिक त्रासदेखील सहन करावा लागला होता”. दरम्यान, २०२१ साली तिने जुळ्याना जन्म दिला. त्यावेळी तिने फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली होती. तसेच त्यानंतर ती पूर्णतः चित्रपटसृष्टीपासून दूर असलेली पाहायला मिळत आहे.