Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वात आपल्या साध्या व सोप्या राहणीमानाने घरातील सदस्यांबरोबरच घराबाहेरील प्रेक्षकांची मनं जिंकणारा स्पर्धक म्हणजे सूरज चव्हाण. घरात आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच सूरजने अनेकांची मनं जिंकली आहेत. त्याला या घरातील टास्क व गेम कळत नसल्याबद्दल अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. रितेशनेदेखील त्याने खेळ समजून घेऊन मग खेळावा असं म्हटलं आहे. सूरजचं या घरातील प्रत्येक स्पर्धकाबरोबर चांगलंच जमतं. या घरात त्याचे कुणाशीही मतभेद किंवा वाद नसून त्याने केलेल्या प्रत्येक कृतीचे कौतुक केलं जातं. घरात आल्यापासून तो ‘टीम बी’बरोबर राहत आहे. त्यामुळे या टीममधील सर्वांबरोबर त्याचं चांगलंच जमतं. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
‘बिग बॉस मराठी’च्या घरात सूरजने सर्वांबरोबर चांगलेच बंध तयार केले आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीबरोबरचा त्याचा बॉण्ड खास आहे आणि हे वेळोवेळी प्रेक्षकांना पाहायलादेखील मिळाले आहे. धनंजय, अभिजीत, पॅडी व अंकिता यांच्याबरोबर त्याचं खास नातं तयार झालं असून या प्रत्येकाबरोबरचे खास क्षण प्रेक्षकांनी अनुभवले आहेत. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात पॅडी व सूरज यांच्यातली मजामस्ती प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चा आजचा भाग खूपच रंजक असणार आहे. आज सूरज व पॅडी एकमेकांबरोबर मजामस्ती करताना दिसणार आहेत. पॅडी कांबळे सूरजला म्हणत आहेत की, “पुढच्यावेळी नॉमिनेशनमध्ये मी तुला नॉमिनेट करणार आहे”. त्यावर पॅडी दादांना उत्तर देत सूरज म्हणतो की, “तुम्ही काहीही करा. मी भीत नाही. मी घरातल्या कोणालाच भीत नाही”.
यावर पॅडीही “मी तुला भीतो का?” असं म्हणतात. पुढे सूरज असं म्हणतो की, “आता मी फोडणार आणि फूल नडणार”. यावर पॅडी त्याला “काय करणार?” असं विचारतात. पुढे सूरज गंमतीने त्यांना असं म्हणतो की, “तुमच्या पोटाच्या चकल्या करेल. तोंडावर बोट ठेवा आणि शांत बसा. एकही शब्द बोलू नका”. मग सुरज पुन्हा त्यांना गंमतीने “तुमच्या पोटात बुक्की हाणू का?” असं म्हणतो. यावर पॅडी कांबळे सूरजला ” हा कर तुला काय करायचं आहे ते कर. तू काय किंग आहेस. त्यामुळे तू काहीही करु शकतोस” असं मस्करीत म्हणतात.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अरबाज पटेल हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या सदस्यांपैकी कोण आपला गेम प्लॅन अधिक चांगला आखणार? कोण सेफ होणार आणि कोण अनसेफ होणार? याकडे ‘बिग बॉस मराठी’च्या प्रेक्षकांच्या लक्ष लागले आहे.