मराठी सिनेसृष्टीमध्ये कलाकारांच्या जोड्या कायमच चर्चेत असतात.अशीच सुख म्हणजे नक्की काय असत मालिकेतून घरा घरात पोचलेली देवकी म्हणजे अभिनेत्री मीनाक्षी राठोड. तिच्या अभिनयातील सहजेतने खलनायिका म्हणून देखील प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवून दिलं.मॅड हेड म्हणत तिला एक वेगळीच ओळख मिळाली.(Meenakshi Rathod Special Post)
तिच्या कामासोबतच तिची मुलगी यारा हिच्या जन्मांतर ती वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. याराच्या जन्माच्या वेळी गरोदरपणातही मीनाक्षी शेवटपर्यंत काम करत होती.म्हणून तीच विशेष कौतुक झालं.याराच्या जन्मांनंतर मीनाक्षीने काही महिने कामातून ब्रेक घेतला होता.त्या नंतर स्टार प्रवाह वरील अबोली मालिकेतून मीनाक्षीने काम बॅक केले.नुकताच याराचा पहिला वाढिवस पार पडला.तिच्या वाढदिवसाचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाले.
पाहा काय आहे मीनाक्षीची पोस्ट?(Meenakshi Rathod Special Post)
तिच्या आणि कैलाशच्या जोडीला देखील तितकंच प्रेम मिळत आहे.मीनाक्षी तिच्या सोशल मीडियावरून त्या दोघांचे बरेच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.तिच्या अनेक मुलाखतींमध्ये तिने जोडीदार म्हणून कैलाशचं कायम कौतुक केलं आहे. ती म्हणते मी कामाला जाते, तेव्हा अगदी आई सारखी कैलाश याराची काळजी घेतो. तो पाठीशी आहे म्हणून मी बिनधास्त काम करू शकते.
हे देखील वाचा : याराच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त ‘चंद्रा’ गाण्यावर थिरकली अभिनेत्री गिरीजा प्रभू
आज कैलाशच्या वाढदिवसानिमित्त मीनाक्षीने एक खास व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे.त्या व्हिडिओला मीनाक्षीने,happy happy birthday to the most kind and lovely human my backbone असं कॅप्शन दिलं आहे.मीनाक्षीच्या या पोस्ट वर सुख म्हणजे नकी काय असत मालिकेच्या कलाकारांनी देखील कमेंट करून कैलाशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(Meenakshi Rathod Special Post)
