शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कचऱ्यात फेकलेल्या मुलीचं नशीब चमकलं, मिथुन चक्रवर्तींनी उचलून घरी आणलं अन्…; दत्तक मुलगी दिशा चक्रवर्ती आता काय करते?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 22, 2025 | 10:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mithun Chakraborty Daughter

कचऱ्यात फेकलेल्या मुलीचं नशीब चमकलं, मिथुन चक्रवर्तींनी उचलून घरी आणलं अन्…; दत्तक मुलगी दिशा चक्रवर्ती आता काय करते?

Mithun Chakraborty Daughter  : मिथुन चक्रवर्ती हे मनोरंजन क्षेत्रातील नेहमीच चर्चेत असणार नाव आहे. स्टारडम आणि भारतीय सिनेमामध्ये त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांचे व्यावसायिक आयुष्य नेहमीच चर्चेत असताना, वैयक्तिक जीवनही चर्चेत राहिलेले पाहायला मिळाले. विशेषत: त्यांची दत्तक मुलगी दिशांनीमुळे ते चर्चेत राहिलेले दिसले. अभिनेत्याने हेलेना ल्यूकशी लग्न केले आणि चार महिन्यांनंतर ते विभक्त झाले. त्यानंतर त्यांनी योगिता बालीशी लग्न केले, त्यांना तीन मुले आहेत.त्यांची ही तीनही मुलं शोबिज उद्योगात आपले स्थान घेत आहेत. तर मिथुन यांची दत्तक मुलगी दिशांनी हिने आधीच हॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे हे फार कमी जणांना ठाऊक असेल.

दिशानी चक्रवर्ती ही मिथुन चक्रवर्ती आणि योगिता बाली यांची दत्तक मुलगी आहे. दिशानीला तीन भाऊ आहेत. महक्ष्या चक्रवर्ती, उमपय चक्रवर्ती आणि नामशी चक्रवर्ती. दिशानीचा जन्म कोलकाता येथे झाला आणि जन्मानंतर तिच्या आईवडिलांनी तिला कचर्‍याच्या ढिगाऱ्याजवळ सोडले. तेथे काही राहणा -या लोकांनी तिला पाहिले आणि त्यातील एकाने घरी आणले. वृत्तपत्रात या प्रकाराबद्दल वाचल्यानंतर मिथुन ताबडतोब कोलकत्ताला पोहोचले. अभिनेत्याला मुलगी दत्तक घ्यायची होती आणि त्याच्या पत्नीनेही त्यांच्या या निर्णयाचे समर्थन केले.

आणखी वाचा – अहमदाबाद विमान अपघातात बचावलेल्या व्यक्तीला खोटं ठरवणं प्रसिद्ध अभिनेत्रीला पडलं महागात, नेटकरी भडकले, माफी मागायला लावली आणि…

मिथुन आणि योगिताने औपचारिकता पूर्ण केली आणि कायदेशीररित्या दिशानीला दत्तक घेतले. तिला घरी आणल्यानंतर चक्रवर्ती कुटुंबाने तिचे नाव दिशानी असे ठेवले. दिशानी यांचे तिच्या वडिलांशी खूप जवळचे नाते आहे आणि त्यांच्यासारखीच तिने कारकीर्ददेखील बनविली. आपले प्रारंभिक शिक्षण भारतात पूर्ण केल्यानंतर, ती पुढील अभ्यासासाठी लॉस एंजेलिस, यूएसए येथे गेली. तिने ‘न्यूयॉर्क फिल्म Academy’ मधून अभिनयात पदवी प्राप्त केली.

आणखी वाचा – भरपवासात भिजत आदेश बांदेकरांनी केलं वारीचं सूत्रसंचालन, गर्दीत अडकलेल्या रुग्णवाहिकेचीही वाट मोकळी केली अन्…; नेटकऱ्यांकडून कौतुक

२०१७ मध्ये, दिशानीने हॉलीवूडमध्ये ‘गिफ्ट’ शॉर्ट फिल्मसह अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. २०२२ मध्ये ती दुसरी शॉर्ट फिल्म ‘द गेस्ट’मध्ये दिसली आणि यांत तिची स्तुती झाली. दिशानी माइल्स मंट्जारिस नावाच्या मुलाला डेट करत आहे. हे जोडपे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलताना दिसते. अलीकडील वृत्तानुसार, मिथुन चक्रवर्ती आणि त्यांची पत्नी योगिता बाली चक्रवर्ती त्यांचा मुलगा नमशी चक्रवर्ती यांच्या ‘टोस्टेड एक कड़क लव स्टोरी’ मिनी मालिकेत दिसणार आहेत.

Tags: bollywood newsentertainmentMithun Chakraborty
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Anupamaa Set Burns In Ashes 

'अनुपमा' मालिकेच्या सेटला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी, नेमकं काय झालं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.