आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. बराच काळ ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्याचसोबत टीआरपीच्या शर्यतीत देखील मालिकेने आपलं स्थान टिकवण्याचं प्रयत्न केला आहे.(Khushboo tawde son Video)
मालिकेतील कलाकारांच्या, अभिनयातील सहजतेने प्रत्येकाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं आहे.आणि त्याचमुळे कलाकारांची पडद्यामागची धमाल,बॉण्डिंग देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतं.सध्या मालिकेत एक वेगळं वळण पाहायला मिळतं.मालिकेत आशोतोषची बहीण विना म्हणजेच अभिनेत्री खुशबू तावडेची एन्ट्री झाली आहे.
पाहा राघवचा गोडं व्हिडिओ (Khushboo tawde son Video)
ही नवीन एंट्री आता मालिकेत काय नवा ट्विस्ट आणणार हे बघणं रंजक ठरणार आहे. अभिनेत्री खुशबू तावडे तिचा मुलगा राघव सोबत अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.माय लेकाच्या या जोडीला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळताना पाहायला मिळतं.नुकताच खुशबूचा मुलगा राघव आई कुठे काय करते या मालिकेच्या सेट वर गेला होता. त्याच्यासोबतच एक गोडं व्हिडिओ अभिनेत्री रुपाली भोसलेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे.
हे देखील वाचा : देशमुखांच्या घरी चोरी-ईशाचा जीव धोक्यात?
रुपालीने कॅप्शनमध्ये असं लिहलं आहे की, तर हा आहे राघोबा म्हणजेच खुशबू तावडे अक्का विनाचा मुलगा. राघव तो जेव्हा मेकअप रूम मध्ये आला तेव्हा जरा शांत होता,त्याने विचार केला असेल,अरे आई कुठे घेऊन आली या सगळ्या मोठ्या माणसांमध्ये, पण मग त्याला कळालं अरेच्या हे तर आपल्या पेक्षा लहान आहेत.आणि त्याची आमच्याशी दोस्ती झाली.खरचं लहान मुलांसोबत आपणही लहान होऊन जातो.म्हणून तर म्हणतात,keep the child alive in you . रुपालीच्या या व्हिडिओवर अभिनेत्री आणि राघवची मावशी तितिक्षा तावडे हिने देखील कमेंट केली आहे.(Khushboo tawde son Video)