स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते ही मालिका बराच काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेत येणाऱ्या वेगवगेळ्या वळणांमुळे मालिकेचा प्रेक्षक वर्ग देखील मोठा आहे.(Isha in trouble)
सध्या मालिका एका वेगळ्या वळणावर आहे. अरुंधती घरी नाही आहे. आणि कुटुंबावरती अनेक संकट एकाच वेळी येत आहेत. यशचा अपघात आणि त्यात आता दुष्काळात तेरवा महिना म्हणत देशमुखांच्या घरात चोर शिरला आहे.
पाहा काय घडलं आजच्या भागात?(Isha in trouble)
आजच्या भागात अभिमन्यू चोरी करून पळत असतो तितक्यात आशोतोष आणि नितीन देशमुखांकडे पोहचतात आणि त्याला अडवतात. तेवढ्यातच यश,इशा आणि अनिश घरी येतात, अभिमन्यू आशोतोषच्या तावडीतून सुटका करतो आणि डायनिंग टेबल वर असलेला चाकू घेतो आणि इशा वर रोखतो. तेव्हा संजना आणि अनिरुद्ध देखील घरी पोहचतात आणि इशाचा जीव धोक्यात असल्यामुळे सगळेच घाबरतात.(Isha in trouble)
हे देखील वाचा : सिनेसृष्टीमध्ये प्रार्थनाला १४ वर्ष पूर्ण-रेशीमगाठ च्या टीमने दिलं सरप्राईज

तेव्हा अभिमन्यू सगळयांना सांगतो की, मला जाऊद्यात नाही तर मी हिला सोडणार नाही. अभिमन्यू बोलण्यात गुंग असतो तेव्हा इशा स्वतःची सुटका करते. त्यानंतर अनिरुद्ध खूप चिडतो. तेव्हा सगळे अभिमन्यूला विचारतात की, तू चांगल्या घरातला वाटतोस मग अशी चोरी का करतोस? तेव्हा अभिमन्यू त्यांना सांगतो कि कोविड मध्ये माझी नोकरी गेली, आणि माझे वडील आजरी असतात. त्यांना मला पैसे पाठवायचे असतात. आणि सध्या मला नोकरी मिळत नाही आहे म्हणून मी हा मार्ग निवडला, मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका.तरी ही अनिरुद्ध त्या मुलाला पोलिसांच्या तब्यत देतो. त्यानंतर आशुतोष आणि नितीन त्याला सोडवण्यासाठी जातात.दुसऱ्या दिवशी झालेल्या प्रकारामुळे कांचन आई अस्वस्थ असते.सगळे तिला समजवतात.आणि कांचन आई सर्वांची माफी मागते.