सध्या सिनेसृष्टीमध्ये काही कलाकार मंडळींनी या जगाचा निरोप घेतल्याची बरीच उदाहरणे कानावर पडत आहेत. अशातच आणखी एका कलाकाराने या जगाचा निरोप घेतल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेता कोल्लम सुधी या मल्याळम अभिनेत्याचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. अवघ्या वयाच्या ३९व्या वर्षी अभिनेता कोल्लम सुधी याला जगाचा निरोप घ्यावा लागला. (Kollam Sudhi Passes Away)
त्रिशूरमधील कॅपमंगलम येथे सोमवारी म्हणजेच ५ जून रोजी पहाटे ४:३०च्या सुमारास त्यांच्या कारचा अपघात झाला. मालवाहू ट्रकने दिलेल्या कारच्या धडकीत त्यांच्या कारचा अपघात झाल्याचं समोर आली आहे. या अपघातात कोल्लम सुधी या अभिनेत्याचा मृत्यू झाला असून अभिनेता बिनू आदिमाली, उल्लास आणि महेश हे तीन मिमिक्री कलाकार ही जखमी झाले आहेत.
हे देखील वाचा – या कलाकार मंडळींनी वाहिली सदाबहार सुलोचना दीदी यांना आदरांजली
मीडिया वृत्तानुसार कोल्लम सुधी आणि त्याचंसह असलेलं तीन सहकलाकार हे त्यांचा टीव्ही कार्यक्रम संपवून घरी परतत असताना हा अपघात झाला. दरम्यान कोल्लम0 सुधी यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना वाचवणं कठीण झालं. तातडीने त्या सर्वांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र कोल्लम सुधी यांनी त्यांचा जीव गमावला. तर इतर तिन्ही कलाकारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत’, अशी माहिती पोलिसांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली.(Kollam Sudhi Passes Away)
कोल्लम सुधी हे मल्याळम सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेते होते. ‘कट्टप्पनयिले ऋत्विक रोशन’ ‘वाकाथिरिवु’ ‘एस्केप’, ‘केसु ई वेदीन्ते नाधन’ यासारख्या अनेक चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. स्टार मॅजिक या कार्यक्रमामुळे कोल्लम सुधी याना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. स्टार मॅजिक या कार्यक्रमाशिवाय इतर अनेक कॉमेडी शोमध्येही त्यांनी पाहुणे कलाकार म्हणून हजेरी लावली होती.