शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून सोनूला मालिकेमधून का काढलं?, अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली, “माझी उंची…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 27, 2024 | 6:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jheel Mehta on Taarak Mehta ka ooltah Chashma

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधून सोनूला मालिकेमधून का काढलं?, अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली, "माझी उंची…"

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ने गेल्या १६ वर्षामध्ये प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या मालिकेमध्ये अनेक कलाकार सहभागी झाले. असेच अनेक कलाकारांनी मालिकेला रामरामदेखील केला. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अशातच आता या मालिकेमध्ये ‘सोनू’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री झीलने महताने तब्बल १२ वर्षांनी मालिका सोडण्यामागचे खरं कारण स्पष्ट केले आहे. यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.  (Jheel Mehta on Taarak Mehta ka ooltah Chashma)

२०१२ मध्ये झील ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेतून बाहेर पडली होती. त्यानंतर तिची उंची जास्त असल्यामुळे निर्माते असित मोदी यांनी तिला मालिकेतून काढले असल्याचे अनेक माध्यमांमधून समोर आले होते. पण यावर अभिनेत्रीने आपले मौन सोडत यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्वतः झीलने स्पष्ट केले आहे. नुकतीच ‘टेली चक्कर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये झीलने मालिका सोडण्यामागचे खरे कारण स्पष्ट केले आहे. यावेळी ती म्हणाली की, “मी त्यावेळी दहावीमध्ये होते. दहावीची परीक्षा महत्त्वाची असल्याने मालिका सोडली होती. अभ्यास करता यावा म्हणून मी मालिकाच सोडण्याचा निर्णय घेतला”, असे तिने सांगितले.

आणखी वाचा – Video : लखनऊमध्ये अक्षय कुमार व टायगर श्रॉफ पोहोचताच लोकांनी चप्पल फेकून मारल्या अन्…; पोलिसांकडून लाठीचार्ज, भयावह दृश्य समोर

View this post on Instagram

A post shared by Jheel Mehta (@jheelmehta_)

यापुढे ती असं म्हणाली की, “जेव्हापासून मी मालिकेत दिसणे बंद झाले तेव्हापासून अनेक तर्कवितर्क मांडले जाऊ लागले. लोकांना खरंच वाटले की माझी उंची जास्त असल्याने मला मालिकेच्या निर्मात्यांनी काढले होते. पण असे नसून मी माझ्या परीक्षेच्या तयारीसाठी मालिका सोडली आणि याचा मला कोणताही पश्चाताप नाही”.

आणखी वाचा – लग्नाच्या दोन वर्षांनंतर सुप्रसिद्ध अभिनेता घेणार घटस्फोट, सतत होणाऱ्या वादामुळे संसारच न करण्याचा निर्णय, म्हणाला, “आमच्यात मतभेद…”

झीलने मालिका सोडल्यानंतर त्यामध्ये अनेक कलाकारांनी काम केले. अनेकदा ही मालिका वादाच्या भोवऱ्यातदेखील सापडली आहे. ‘तारक मेहता का उलट चश्मा’ या मालिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. लहानगी सोनू अर्थात झील लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच तिने तिच्या बॉयफ्रेंडबरोबर साखरपुडाही केला असून तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव केला.

Tags: asit modihindi actressjheel MehtaTaarak Mehta ka ooltah chashmatelevision serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Sonalee Kulkarni talk about her husband kunal bonedekar profession

मुळ युकेचा, दुबईमध्ये राहतो अन्…; सोनाली कुलकर्णीचा नवरा नक्की काय काम करतो?, पहिल्यांदाच अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "मोठमोठ्या बँकांमध्ये…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.