बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : लखनऊमध्ये अक्षय कुमार व टायगर श्रॉफ पोहोचताच लोकांनी चप्पल फेकून मारल्या अन्…; पोलिसांकडून लाठीचार्ज, भयावह दृश्य समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 27, 2024 | 12:22 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
akshay kumar and tiger shroff movie promotion

Video : लखनऊमध्ये अक्षय कुमार व टायगर श्रॉफ पोहोचताच लोकांनी चप्पल फेकून मारल्या अन्...; पोलिसांकडून लाठीचार्ज, भयावह दृश्य समोर

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार व टायगर श्रॉफ हे त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. दोघांचीही एकत्रित भूमिका असलेला ‘बडे मिया छोटे मिया’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित करण्यात येणार असून या चित्रपटामध्ये अक्षय व टायगर दोघांचीही दमदार ॲक्शन पाहायला मिळणार आहे. नुकतेच दोघांनी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लखनऊ येथे हजेरी लावली होती. पण या प्रमोशनच्या कार्यक्रमाला गालबोट लागले. लोकांनी चप्पल, हेलमेट फेकले त्यामुळे पोलिसांना देखील लाठीचार्ज करावा लागला. नक्की काय घडले हे जाणून घेऊया. (Akshay Kumar and Tiger Shroff movie promotion)

लखनऊ शहरामध्ये चित्रपटाच्या प्रमोशन सोहळ्याप्रसंगीचे अक्षय व टायगरचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. ‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार, अक्षय व टायगरचा कार्यक्रम होणार आहे असे समजताच मोठ्या संख्येने चाहते जमा होऊ लागले होते. काही लोकांनी अक्षयला गाणे गाण्याची विनंती केली. अभिनेत्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहनही केले. पण गर्दी वाढतच गेली आणि काही वेळाने गर्दीमध्ये मारामारी होण्यास सुरवात झाली.चाहत्यांची विनंती पूर्ण केली नाही म्हणून मंचावर उभे असणाऱ्यांवर चप्पल फेकण्यास सुरुवात केली गेली.

आणखी वाचा – मेहुणीच्या नवऱ्यासाठी प्रथमेश लघाटेच्या हटके शुभेच्छा, भावजींबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाला, “मोठे साडू…”

https://x.com/Akkistaan/status/1762111022155137383?s=20

Video: Our #BadeMiyanChoteMiyan grooving on the beats of #BadeMiyanChoteMiyanTitleTrack in Lucknow today.#AkshayKumar???? #TigerShroff pic.twitter.com/KYW3AuKSiY

— Akshay Kumar 24×7 (@Akkistaan) February 26, 2024

फेकलेल्या चप्पल आणि इतर वस्तू अभिनेत्यांना लागल्या नाहीत पण मंचावर मात्र पडलेल्या दिसून आल्या. बिथरलेल्या गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी मात्र पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या सर्व प्रकारात परिस्थिती गंभीर झाली. ही परिस्थिती काही काळानंतर पोलिसांच्या मदतीने आटोक्यात आणण्यात यश आले. योजलेला कार्यक्रम पूर्ण करण्याआधीच अभिनेत्यांना कार्यक्रमामधून काढता पाय घ्यावा लागला. दरम्याने घडल्या प्रकारावर अक्षय व टायगर यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

आणखी वाचा – “नेता ब्राम्हण म्हणून अपशब्द वापरले अन्…”, केतकी चितळेचा मनोज जरांगेंना अप्रत्यक्ष टोला, म्हणाली, “सर्कशीत असलेल्या कलाकारांवर…”

‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जाफर करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो शेअर केले होते. या चित्रपटामध्ये अक्षय व टायगर व्यतिरिक्त पृथ्वीराज सुकुमारन्,सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर,अलाया एफ व रोनित बोस रॉय हे कलाकार दिसणार आहेत.

Tags: akshay kumarbade miya chote miyanew hindi movietiger Shroff
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Next Post
Sai Lokur replied to people trolling about post pregnancy body through Instagram story

"स्त्रीला तिच्या शरीरावरुन बोलणं…", गरोदरपणानंतर वाढत्या वजनावरुन सई लोकूरला हिणावलं, अभिनेत्री भडकली, म्हणाली, "सी-सेक्शननंतर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.