अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन या नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतात. त्या नेहमीच कोणत्याही विषयावर आपले स्पष्ट मत व्यक्त करताना मागेपुढे पाहत नाहीत. यासाठी त्यांना बरेचदा टिकाकारांना सामोरे जावे लागते. अशातच त्यांनी भाष्य केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. “त्या महिला व मुली मूर्ख आहेत, जे डेटवर जातात आणि नंतर बिल विभागून देतात. फक्त पुरुषांनीच बिल भरावे”, असं जया बच्चन यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. (Jaya Bachchan Statement)
जया बच्चन यांनी त्यांची नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्ट शो ‘व्हॉट द हेल’च्या दुसऱ्या सीझनच्या ताज्या भागात हे सांगितले. या भागात नव्या नवेली नंदा यांनी स्त्रीवादावर भाष्य केले आणि महिलांना आता अधिक सक्षम वाटत असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना ती म्हणाली, “जर तुम्ही एखाद्या मुलीला डेटवर घेऊन गेलात आणि तुम्ही बिल भरा असं म्हटल्यास, काही लोक यामुळे नाराज होतात, कारण महिलांना त्याचा तितकाच अधिकार वाटतो”. पण नव्याने काही बोलण्याआधीच जया बच्चन म्हणाल्या की, “ज्या महिला हे करतात त्या मूर्ख आहेत”. त्या म्हणाल्या, “किती मूर्ख आहेत त्या महिला. त्यापेक्षा पुरुषांना बिल भरण्याची मुभा द्यावी”.
यानंतर नव्याने आजी जया बच्चन व आई श्वेता नंदा यांना विचारले की, “त्यांच्या काळात आणि आजच्या काळात पुरुषांमध्ये काही बदल झाला आहे का? म्हणजे त्यांच्या काळात ते कसे होते आणि आज कसे आहेत?”, याला उत्तर देताना श्वेता बच्चन नंदा म्हणाल्या, “आमच्या काळात माणसाने सहनशील असावे आणि गप्प रहावं, असा समज होता. डेटिंग करत असतानादेखील, त्या व्यक्तीची प्रतीक्षा करावी जो तुमच्याकडे येऊन प्रपोज करेल”. जया यांनी लेकीची ही गोष्ट मान्य केली आणि तिलाही तेच आवडेल असे सांगितले. ती म्हणाली, “पुरुषाने आधी प्रपोज केले तर बरे होईल. अन्यथा, मला खूप विचित्र वाटेल”.
नव्याने भाऊ अगस्त्य नंदाबद्दल खुलासा केला की, “तो खूप संवेदनशील आहे आणि रडायला लागतो. किंबहुना उघडपणे रडण्यातही त्याला संकोच वाटत नाही”. अगस्त्यने महिला व मुलींबाबत पुरुषांच्या कृतीवरही मत व्यक्त केले. ते म्हणाले की, “कोणत्याही कृतीमागे तुमचा हेतू महत्त्वाचा असतो. जर पुरुषाने महिलांसाठी दयाळूपणा दाखवणं चांगले आहे. पण आपण श्रेष्ठ आहोत या उद्देशाने पुरुष हा दयाळूपणा दाखवण्यात कचरतो”.