शनिवार, मे 24, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘दंगल’मधील छोट्या बबीता फोगटच्या निधनानंतर तिच्या घरी पोहोचला आमिर खान, ‘ती’ एक गोष्ट घेऊन गेला अन्…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 23, 2024 | 12:49 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Aamir Khan visit the Faridabad to console Suhani Bhatnagar's parents after her death

‘दंगल’मधील छोट्या बबीता फोगटच्या निधनानंतर तिच्या घरी पोहोचला आमिर खान, ‘ती’ एक गोष्ट घेऊन गेला अन्…

‘दंगल’ चित्रपटामधून छोटी बबिता म्हणून सर्वांच्याच पसंतीस पडलेली अभिनेत्री म्हणजे सुहानी भटनागर. नुकत्याच तिच्या आकस्मिक निधनाने मनोरंजन सृष्टीमधील अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त केले होते. मृत्यूसमयी तिचे वय अवघे १९ वर्ष होते. त्यामुळे सुहानीच्या अकाली निधनावर कलाकारांसह चाहत्यांनी शोक व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी सुहानीच्या शोकसभेसाठी महिला कुस्तीपटू बबिता फोगाट उपस्थित राहिली होती. यावेळी तिने कुटुंबीयांचे सांत्वन केले व तिच्या आई-वडिलांना धीर दिला. अशातच आता बॉलिवूड अभिनेता आमिर खाननेदेखील नुकतीच सुहानीच्या फरीदाबाद येथील घरी भेट दिली.

काल (२२ फेब्रुवार) रोजी अभिनेता आमिरने सुहानीच्या घरी जाऊन आई-वडिलांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. तसेच यावेळी तिची फोटो फ्रेम देत आई-वडिलांबरोबर फोटोही काढला. काही दिवसांपूर्वी सुहानीचा अपघात झाला होता. त्यासाठी तिच्यावर उपचार सुरू होते. पण काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे तिच्या शरीरात पाणी तयार होऊ लागले. यामुळे तिला ‘डर्मेटोमायोसिटिस’ हा दुर्मिळ आजारही झाला होता. यामुळे तिची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना तिला इन्फेक्शन झाले आणि फुप्फुसं कमजोर होऊन त्यामध्ये पाणी झाले. त्यामुळे तिला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला आणि यादरम्यान अभिनेत्रीचा मृत्यू झाला.

View this post on Instagram

A post shared by Suhani Bhatnagar (@bhatnagarsuhani)

हेही वाचा – “ज्या महाराष्ट्रात मी जन्मलो…”, ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार स्वीकारताच अशोक सराफांचे डोळे पाणावले, म्हणाले, “हे ऋण कधीही…”

२०१६ मध्ये नितीश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. यामध्ये आमिर खान,फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, जायरा वसिम, सुहानी भटनागर, साक्षी तन्वर आणि अपारशक्ती खुराणा यांच्या दमदार भूमिका पाहायला मिळाल्या होत्या. या चित्रपटामध्ये महावीर सिंह फोगाट आणि त्यांच्या मुली बबिता व गीता फोगाट यांच्या संघर्षाची कहाणी दाखवली होती. सुहानीने या चित्रपटात आमीर खानच्या लहान मुलीची भूमिका बजावली होती.

हेही वाचा – Video : श्रीवर्धनची आहे प्रथमेश परबची होणारी बायको, पारंपरिक पद्धतीने गावामध्ये करत आहे लग्नापूर्वीच्या विधी, मांडव स्थापना अन्…

आमिर खानच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर सध्या त्याचे कौतुक केले जात आहे. दरम्यान आमिरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर आमिर सध्या अनेक चित्रपटांवर काम करत आहे. तसेच निर्मिती क्षेत्रामध्येही तो आपले नशीब आजमावत आहे. सध्या त्यांच्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेला ‘लापता लेडीज’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: aamir khanbollywood actorbollywood actressbollywood newsDangal Fame ActressSuhani BhatnagarSuhani Bhatnagar Death Newsआमिर खानदंगल फेम अभिनेत्रीबॉलिवूड अभिनेताबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीसुहानी भटनागर
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Viral Video
Entertainment

Video : जंगलात योगा करत होती महिला, तोल जाताच नदीत वाहून गेली अन्…; नको तो स्टंट करणं जीवावर बेतलं

मे 23, 2025 | 7:00 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Women

हगवणे कुटुंबातील खरी व्हिलन नक्की करते तरी काय?, नणंदच दोन्ही भावजयांसाठी ठरली राक्षस

मे 23, 2025 | 6:56 pm
Navi mumbai Youth alive after heart attack
Lifestyle

गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका, १५ मिनिटं हृदय बंद, तरीही जिवंत असलेला ‘तो’ नक्की कोण?, काळ आला होता पण…

मे 23, 2025 | 6:40 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

आई-बापाच्या विरोधात लग्न करण्याची हिच शिक्षा का?, वैष्णवीने बाळाचाही विचार न करता…

मे 23, 2025 | 6:04 pm
Next Post
Jaya Bachchan Statement

"डेटला गेल्यावर मुलांनीच पैसे भरावेत", जया बच्चन यांचा मुलींना खर्च न करण्याचा सल्ला, अजब वक्तव्यानंतर म्हणाल्या, "किती मुर्ख महिला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.