सध्या हिंदीसह मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये जोरदार लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच ‘टाइमपास’ फेम अभिनेता प्रथमेश परब लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. प्रथमेश क्षितिजा घोसाळकरबरोबर विवाहबंधनात अडकणार असून त्यांच्या लग्नाआधीच्या विधींनादेखील सुरुवात झाली आहे. नुकताच प्रथमेश व क्षितिजा यांचा हळदी समारंभ सोहळा पार पडला. त्यांच्या या हळदी समारंभाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
अशातच प्रथमेशच्या होणाऱ्या बायकोच्या घरीदेखील तिच्या लग्नाआधीच्या विधींणा सुरवात झाली आहे. प्रथमेशची होणारी बायको क्षितिजा ही कोकणातील असून कोकणात लग्नाआधीचे पारंपरिक विधी पार पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोकणात लग्नाआधी मांडवस्थापना हा विधी केला जात असून नुकताच क्षितिजाचा हा पारंपरिक विधी पार पडला आहे, या विधीचे काही खास क्षण क्षितिजाने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.
क्षितिजाने या पारंपरिक विधीसाठी पिवळ्या रंगाची साडी परिधान केली असून तिच्या डोक्याला मुंडावल्यादेखील पाहायला मिळत आहेत. क्षितिजाच्या कोकणातल्या घरी पार पडणाऱ्या या विधींमध्ये तिच्या घरच्यांनी व नातेवाइकांनी चांगलाच सहभाग घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये तिच्या घराची झलकही पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये छान मंडप घालून सजावट केली असल्याचेदेखील पाहायला मिळत आहे.
दरम्यान, नुकतेच क्षितिजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन प्रथमेशच्या नावाची मेहंदी लागल्याचे फोटो शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रथमेश व क्षितिजा घोसाळकरचा साखरपुडा समारंभ अगदी थाटामाटात पार पडला. व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधत त्यांनी त्यांच्या प्रेमाच एक पाऊल पुढे टाकलं. कोणताही अवाढव्य खर्च न करता अत्यंत साधेपणाने त्यांचा हा साखरपुडा समारंभ पार पडला. अशातच आता त्यांच्या कोकणातल्या घरीही लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे