शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“विकी भैय्याचा अहंकार…”, अंकिता लोखंडे-विकी जैनच्या नात्यावर देवोलीना भट्टाचार्जीचं मोठं भाष्य, म्हणाली, “खालच्या पातळीवर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 16, 2023 | 7:36 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
actress devoleena bhattacharjee tweet on ankita lokhande and vicky jains relation

“विकी भैय्याचा अहंकार...”, अंकिता लोखंडे-विकी जैनच्या नात्यावर देवोलीना भट्टाचार्जीचं मोठं भाष्य, म्हणाली, “खालच्या पातळीवर...”

अभिनेता सलमान खानचा टीव्हीवरील लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने पती विकी जैनसह ‘बिग बॉस १७’मध्ये एन्ट्री केली. ही जोडी या शोमध्ये आल्यापासूनच चर्चेत आहे. या शोमध्ये अंकिता-विकी एकमेकांशी अनेकदा वाईट पद्धतीने भांडताना दिसले. अंकिता-विकी यांच्यात कायमच मतभेद पाहायला मिळाले. त्याचबरोबर अंकिता ही अनेकदा विकीबाबत असुरक्षित असल्याचं चित्र दिसलं. दरम्यान त्यांच्यावर सोशल मीडियाद्वारे अनेकदा प्रेक्षकांनी त्यांची मतं व्यक्त केली. अशातच अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिनेदेखील तिचं मत मांडलं आहे. (Actress Devoleena Bhattacharjee Tweet on Ankita Lokhande And Vicky Jain’s Relation)

देवोलिनाने तिचं मत मांडताना त्यांच्या नात्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. देवोलिनाने ट्विटरवर ट्विट करत असे म्हटले आहे की, “विकी भैय्याचा हा अहंकार त्यांच्या विनाशाचं कारण बनू नये म्हणजे झालं. अर्थात ‘बिग बॉस’ने त्यांना डोक्यावर चढवून ठेवलं आहे. तर त्यांच्यात अहंकार हा येणारच. अंकिता-विकी या शोमध्ये आल्यापासून दोघांचेही आयुष्य खालच्या पातळीवर गेले आहे. मोजक्या शब्दांत सांगायचे झाले तर विकी आपले स्वार्थी व्यक्तिमत्व सिद्ध करण्याच्या नादात स्वत:च्या आयुष्याचा बॅंड वाजवत आहे आणि या सगळ्यात मला अंकितासाठी खूप वाईट वाटत आहे”.

Well #vickybhaiya ka ahankar unka patan ka reason naa bann jaaye. Though @BiggBoss ne itna sar chadaya hai toh tann k toh chalenge hi. But the way he has been treating #ankita since they entered & their personal life is too low. In short apni selfish individuality prove karne k…

— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) November 15, 2023

आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा मृदगंध जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार, नंदेश उमप यांनी केली घोषणा

देवोलिना ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांविषयी ती कायमच भाष्य करत असते. अशातच तिने अंकिता-विकी यांच्यातील भांडणावरदेखील तिने तिचं मत मांडलं आहे. देवोलिनाने अंकिता विकीला काचऱ्यासारखी वागवते असं म्हणत सोशल मीडियावर ट्विट करत भाष्य केले आहे.

आणखी वाचा – “सहा वर्षांनी गरोदर राहिले आणि…”, मुल झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये होती नम्रता संभेराव, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “ढसाढसा रडले अन्…”
देवोलिनाच्या या ट्विटवर लोकांनी अनेक कमेंट्स करत त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका नेटकऱ्याने असे म्हटले आहे की, “विकी चांगला खेळत आहे. पण अंकिता त्याला कचऱ्यासारखी वागवते. विकी हा ‘बिग बॉस’मध्ये गेम खेळण्यासाठी आला आहे. पाळणाघर चालवण्यासाठी नाही”. तर एकाने म्हटले आहे की, “हा शो कपल्ससाठी नाहीच आहे. विकी घरातील २४ तासांच्या आदेशांचे पालन करत नाही”. याउलट काही नेटकऱ्यांनी त्यांना अंकिता-विकी यांच्यातली केमिस्ट्री आवडत असल्याचे सांगत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Tags: ankita lokhandebigg boss 17bollywood newsvicky jain
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Amruta Deshmukh & Prasad Jawade Mehandi Ceremony

मेहंदी रंगली गं! अमृताच्या हातावर रंगली प्रसादच्या नावाची मेहंदी, थाटामाटात पार पडला सोहळा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.