नाटक, मालिका, सिनेमा हे तिन्ही विश्व गाजवल्यानंतर आता ओटीटी क्विन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांची कन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृता हिने सिनेसृष्टीत आईच्या नावाला धक्का पोहचू दिला नाही. आज अमृता सुभाष यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्रींनपैकी एक आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीत आपल्या नावाचा डंका गाजवल्यालानंतर अमृताने बॉलिवूडमध्येही आपलं स्थान भक्कम केलं.(Amruta Subhash Story)
मात्र अमृता तिच्या नावापुढे आडनांव न लावता तिच्या वडिलांचं नाव लावते. यामागचं खरं कारण नेमकं काय आहे याबाबत अमृताने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. नेमकं काय आहे ते कारण जाणून घेऊ आजच्या जपलं ते आपलं या भागात. अनेक कलाकार आजही आपल्या नावापुढे आडनांव न लावता वडिलांचं नाव लिहितात, त्यामागे प्र्त्ये कलाकाराची अशी निराळी कारण असतात, अशीच अभिनेत्री अभिनेत्री अमृता सुभाषच्या नावामागच नेमकं काय कारण आहे, याबाबतचा खुलासा केला आहे.
पाहा का अमृता नावापुढे नाव लावत नाही (Amruta Subhash Story)
ज्योती सुभाष यांची कन्या अमृताही आपल्या नावापुढे अमृता सुभाष असंच नाव लावते. त्याबाबतचं कारण सांगताना अमृता म्हणाली आहे की, मला माझं आडनाव लावता येत नाही हे माझं हळवं दुखणं आहे. माझं आडनाव ढेंबरे आहे. कोणीही हे नाव आजपर्यंत बरोबर उच्चारलेलं नाही. कुणी ढगे म्हणतो, कुणी ढोले, तर कुणी ढमढेरे. त्यामुळे मी आडनांव लावणंच सोडून दिल आहे. पण माझं हे जे नाव आहे, त्याचं खरं सौंदर्य जेष्ठ अभिनेते मोहन गोखले यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं होत. अमृता या नावासारखीच तुझी वाणी आहे, असे त्यांचे माझ्या नावाला घेऊन शब्द होते.(Amruta Subhash Story)
हे देखील वाचा – ‘मी कधी कुणासाठी थांबत नसतो’ हृताने सांगितला विनय आपटेंचा ‘तो’ किस्सा
अमृता हिने आजवर मराठी सोबत हिंदी सिनेमासृष्टीत आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. अमृता आणि तिची आई म्हणजेच ज्योती सुभाष यांनी एकत्र गली बॉय या चित्रपटात काम केलं होत. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. शिवाय गाजलेल्या अनेक वेबसिरीज मध्ये अमृताने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मन जिंकली. सध्या अमृता हीच पुनश्च हनिमून हे नाटक लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.