सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे आदिपुरुष या चित्रपटाची. चित्रपटाच्या घोषणे पासूनच टीकेला समोर जाणार चित्रपट अखेर प्रदर्शित झाला. त्या नंतर सर्व स्तरातून त्यावर सकारात्मक आणि नाकारतांक प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि हा चित्रपट पुन्हा एकदा वादाचा विषय ठरला. चित्रपटाच्या बाबत अनेक कलाकारांनी देखील आपले मत मांडले या विचारांमध्ये आता भर पडली आहे अभिनेत्री केतकी चितळेची.(Ketaki Chitale on Adipurush)
केतकी चितळेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट स्टोरी पोस्ट करून आदिपुरुष या चित्रपटताबाबत आपलं मत मांडले आहे. बऱ्याच लोकांनी मला विचारले की माझे आदिपुरुष या सिनेमा विषयी काय मत आहे.
माझे मत: मी बघितलेला नाही त्यामुळे मी त्यावर बोलू शकत नाही. पण ज्या चित्रपटाच्या टिझर मध्ये शिवभक्त रावण रुद्राक्ष तोडणार असेल तर मी तो चित्रपट बघणारही नाही. रावण एक शिवभक्त ब्राह्मण होते ज्यांनी सौराष्ट्रातील सोमनाथ मंदीर बांधले होते.

सोमनाथ मंदीर अनेक वेळा पडले आहे आणि बऱ्याच राजांनी आणि एका राणीने ते पुन्हा बांधले आहे. त्यापैकी एक श्री रावणही आहेत. रामायण हा घडलेला इतिहास आहे, फिरंगांनी ठरवलेले मिथ्य नाही. पुरावे आहेत रामायणाचे. नवी पिढी मूर्ख नाही की जे त्यांच्या नावावर बिल फाडून सारवासारव करणे चालू शकेल.(Ketaki Chitale on Adipurush)
आदिपुरुष या चित्रपट बाबत अनेक सिने कलाकारांनी नकारात्मक मत मांडले आहे तसेच प्रेक्षकांनी ही चित्रपटात बाबत नकारात्मक मत मांडले आहे.