शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ताई टोपी उलटी घातली”, नवऱ्यासह डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्याने ऐश्वर्या नारकरांची चूक पकडली, उत्तर देत म्हणाल्या…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 19, 2023 | 1:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aishwarya Narkar And Avinash Narkar

"ताई टोपी उलटी घातली", नवऱ्यासह डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्याने ऐश्वर्या नारकरांची चूक पकडली, उत्तर देत म्हणाल्या…

सध्या सोशल मीडियावर रील व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. सेलिब्रिटी कपलही सोशल मीडियावरून ट्रेंडिंग रील शेअर करताना दिसतात. यांत एका रील व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घेतला आहे. हा रील व्हिडीओ शेअर करणारे कपल म्हणजे अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर. आजवर ऐश्वर्या नारकर व अविनाश यांनी शेअर केलेले प्रत्येक रील व्हिडीओ नेहमीच चर्चेत राहिले. ट्रेंडिंग रीलवर नारकर कपलने धरलेला ठेका प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला. (Aishwarya Narkar And Avinash Narkar)

विविध ट्रेंन्डिंग गाण्यावर व्हिडीओ, रील बनवताना नारकर कपल दिसतात. या व्हिडीओंना नेटकऱ्यांकडून बरीच पसंती मिळत असते. पण बऱ्याचदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. बऱ्याचदा ऐश्वर्या त्यांना सडेतोड उत्तरही देताना दिसतात. सोशल मीडियावर ही जोडी नेहमीच सक्रिय असते. सोशलमिडीयावरून काही ना काही पोस्ट करून ऐश्वर्या व अविनाश चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.

आणखी वाचा – छोट्या पडद्यावरील मराठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं थाटामाटात लग्न, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, पाहा फोटो

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

आजवर ऐश्वर्या यांनी त्यांच्या अभिनयाने व सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे. त्यांच्या सौंदर्याचे लाखो चाहते दिवाने आहेत. फिटनेसच्या बाबतीत ही ऐश्वर्या नेहमीच ऍक्टिव्ह असतात. अशातच ऐश्वर्या यांनी पतीबरोबरचा एक रील व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हे नारकर कपल एका भोजपुरी गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. यांत दोघांनीही गांधीटोपी व चष्मा लावून हा रील व्हिडीओ शूट केला आहे.

आणखी वाचा – Video : ‘बिग बॉस १७’ च्या घरात हाणामारी, अंकिता लोखंडे-विकी जैनने अभिषेकला जोरात ढकललं अन्…; म्हणाला, “४० वर्षांचा म्हातारा…”

नारकर कपलच्या या व्हिडीओला भरभरून प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर एका नेटकाऱ्याने केलेल्या गमतीशीर कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका नेटकऱ्याने गमतीत, “ताई टोपी उलटी घातली आहे तुम्ही, शिलाईची बाजू मागे असते. बाकी डान्स नाद खुळा. जोडी नं १” अशी कमेंट केली आहे. या कमेंटवर प्रतिक्रिया देत ऐश्वर्या नारकर यांनी, कपाळाला हात लावल्याचा ईमोजी व हसण्याचा ईमोजी शेअर केला आहे.

Tags: aishwarya narkarAvinash and Aishwarya Narkar New Reelavinash narkarmarathi actormarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
kajol devgan mother actress tanuja health update discharged from hospital on monday evening

काजोलची आई ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा, रुग्णालयामधून घरी आणलं अन्…; नेमकं काय घडलं होतं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.