Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. सततची होणारी भांडण, वादविवाद यांमुळे हा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. अशातच अंकिता लोखंडे-विकी जैन आणि ऐश्वर्या शर्मा- निल भट्ट यांच्यात कडाक्याचं भांडण पाहायला मिळालं. यानंतर आता अंकिता लोखंडे व विकी जैन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अभिषेक कुमार बरोबर त्यांची लढाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अभिषेक कुमारने ‘बिग बॉस १७’ च्या घरात स्पर्धक म्हणून प्रवेश केला तेव्हापासून तो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे.
अभिषेक ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून कोणत्या ना कोणत्या स्पर्धकांशी वाद घालताना दिसला. समोरच्या व्यक्तीबरोबर कारण काढून भांडणे किंवा धक्काबुक्की करणे, त्यांच्यावर हात उचलणे असे अनेक किस्से अभिषेकसह घडताना दिसले. याआधी सनी आर्या म्हणजेच तहलका भाई अभिषेकच्या जाळ्यात अडकला आणि त्याला घरातून एक्झिट घ्यावी लागली. त्यानंतर आता ‘बिग बॉस’ स्टार कपल विकी जैन व अंकिता लोखंडेही अभिषेकच्या जाळ्यात अडकले आहेत.
अभिषेक कुमार त्याची एक्स गर्लफ्रेंड ईशा मालवीयचा बॉयफ्रेंड समर्थ जुरेलसह भांडत असतो. हे भांडण विकी जैनने थांबवण्याचा प्रयत्न केला तर शेवटी विकीचं या वादाच्या भोवऱ्यात अडकला. या भांडणात विकीला अभिषेक वारंवार ‘४० वर्षांचा म्हातारा’ असं बोलताना दिसला. आपल्या बोलण्याचा विकी जैनवर काहीही परिणाम होत नसल्याचे पाहून अभिषेकने विकी व अंकिताला भांडणात ओढण्याचा प्रयत्न केला.
#MunawarFaruqui and #AyshaKhan emotional#VickyJain and #AbhishekKumarPhysical pic.twitter.com/sY9DhInThe
— The Khabri (@TheKhabriTweets) December 18, 2023
अभिषेकने अंकितासाठी ‘वेडी’, तसेच ‘तुझ्यासारखी स्त्री’ असे अनेक शब्द वापरले, जे ऐकून अंकिता-विकीला अभिषेकचा राग आला. त्यानंतर दोघांनी अभिषेकसह कडाक्याचं भांडण केलं. या भांडणात विकी अभिषेकला धक्का देतो आणि लगेचच अभिषेकही विकीला ढकलतो. त्यांनतर अभिषेक ‘बिग बॉस’समोर जाऊन विकी जैन व अंकिता लोखंडे यांनी ढकलल्याचे सांगताना दिसत आहेत. या प्रकरणावरून आता अभिषेकला ‘बिग बॉस’ला समोर जावं लागणार का? ‘बिग बॉस’ कोणाच्या बाजूने निकाल देणार हे पाहणं रंजक ठरेल.